आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भविष्य:काेराेनाने वाढवल्या ज्याेतिष्यांच्या अडचणी; आता लाेकच विचारू लागले - तुम्हाला या बेरोजगारीचा अंदाज आला नव्हता का? 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाने बिघडले कालगणनेचे गणित, पण भविष्य जाणण्यासाठी संकेतस्थळांवर गर्दी

हार्ले फेलन

२०२० ची सुरुवात हाेताच येणाऱ्या वर्षात  तुमच्या जीवनातील संभाव्य बदलांबद्दल ज्याेतिषी खूप भरभरून सांगत हाेते. पण कोराेना संसर्गाने भविष्याचे हे गणितच बदलून टाकले. काेराेना संसर्गाने नजीकच्या काळात सर्व काही ठप्प हाेण्याचा, अचानक बेरोजगार हाेण्याचा काेणीही अंदाज वर्तवला नाही. हेच बघा, सीबीएस वाहिनीवर ज्याेतिषी सुजेन मिलर यांनी २०२० मकर राशीच्या लाेकांसाठी उत्तम  असेल, कर्क राशीचे विवाह जमतील, तूळ राशीच्या लाेकांना जमिनीचे व्यवहार फायद्याचे ठरतील तर वृषभ राशीचे लाेक संपूर्ण वर्ष आंतरराष्ट्रीय प्रवासात व्यग्र राहतील असे म्हटले हाेते. पण मार्च येताच  भविष्यप्रेमींचा संताप वाढू लागला कारण जे भविष्य वर्तवले त्याच्या नेमके उलटे घडत हाेते. 

ज्याेतिषी चानी निकलस यांच्या मते, २०२० वर्ष कठीण असेल हे त्यांना माहिती हाेते. त्यांनी हा अंदाज ग्रहांवरून नाही तर अमेरिकेच्या निवडणूक वर्षामुळे व्यक्त केला हाेता. दुसरीकडे, तुम्हाला काेराेना व बेकारीचे भविष्य का वर्तवता आले नाही,  असे या ज्याेतिष्यांच्या फालाेअर्सने विचारता काहींंनी तर मार्चमध्ये काेराेना संसर्गाचा अहवाल सादर करून त्यांचे सर्व आराेप प्लुटाे ग्रहावर फाेडून माेकळे झाले. जे भविष्य आर्थिक, माेठी लाेकसंख्या व विषाणूशी संसर्गाशी संबंधित असताना देखील. 

या अहवालात म्हटल्याप्रमाणे इटली मिथुन राशीचा देश असून मिथुनचा फुफ्फुसाशी जवळचा संबध आहे. त्यामुळे इटलीवर काेराेनाचा सर्वाधिक परिणाम झाला. तर अमेरिकेच्या एका अहवालामध्ये हा देश कर्क राशीचा असून मे महिन्यात या संसर्गाचा प्रकाेप जास्त हाेईल. उन्हाळ्यात त्याचा प्रभाव कमी झाला तरी हिवाळ्याच्या प्रारंभी त्यात वाढ हाेईल व डिसेंबरपर्यंत त्याचा प्रभाव राहील असे म्हटले हाेते. प्रत्येकाला त्याच्या फायद्याचे काही तरी मिळावे म्हणून भविष्य वर्तवले जाते. परंतु काेविड-१९ चा उल्लेख काेणत्याही भविष्यात नाही कारण ज्याेतिषी भूतकाळ व वर्तमानकाळाचा अंदाज घेऊन भविष्य वर्तवत असतात.

बातम्या आणखी आहेत...