आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा कोरोनाचा स्फोट:बीजिंगमध्ये निर्बंध उठण्याच्या 7 दिवसांनंतर कोरोनाचा स्फोट; 2 कोटी लोकांची पुन्हा तपासणी

बीजिंग20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोना निर्बंध उठल्यानंतर पुन्हा कोरोनाचा स्फोट झाला आहे. सोमवारी इथे ओमायक्रॉनचे नवे २०० रुग्ण आढळले. या वेळी एकट्या बीजिंगच्या हेवन सुपरमार्केटमधून संसर्ग पसरत आहे. हे मार्केट सुपरस्प्रेडर बनले आहे. येथील सर्व कर्मचारी व इतर लोक पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्कातील सुमारे १०,००० लोकांना ट्रेस करून क्वाॅरंटाइन केले आहे. चीनमध्ये अजूनही झीरो कोविड धोरणाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. याअंतर्गत बीजिंगच्या सुमारे २ कोटी २० लाख लोकांची पुन्हा एकदा थ्री लेअर टेस्टिंग केली जाईल. तथापि, निर्बंध उठल्यानंतर ६ जून रोजीच रेस्टॉरंट व बार उघडण्यास परवानगी दिली होती. तर लाखो लोकांनी वर्क फ्रॉम होम संपवले होते. याच्या सात दिवसांतच चीनमध्ये वेगाने संसर्ग पसरत आहे. यामुळे व्यापार २० ते ३० टक्के प्रभावित होत आहे. चीनच्या चाओयांगमध्ये ३.५ कोटी लोकांसाठी ३ दिवस तपासणी अभियान सुरू आहे.

तूर्तास शाळा बंदच
बीजिंगमध्ये निर्बंध उठल्यानंतर पुन्हा वाढणाऱ्या कोरोना संसर्गामुळे शाळा पुन्हा उघडण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे. ११ जून रोजी २७५ रुग्ण आढळले असून पैकी १३४ जणांना कोरोनाची लक्षणे आहेत, तर १४१ जणांना लक्षणे नाहीत.

बातम्या आणखी आहेत...