आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत एका आठवड्यात ५४ टक्के नवे रुग्ण आढळून आले. गेल्या आठवड्यात येथे ५,०२,४६५ नवे रुग्ण आढळले. २२ जुलै राेजी संपलेल्या आठवड्यात ३,२५,८७६ नवे रुग्ण आढळून आले हाेते. अमेरिकेत काेराेनामुळे मृतांचे प्रमाणही १५ टक्के वाढले. गेल्या आठवड्यात येथे २,११८ मृत्यू झाले. २२ जुलै राेजी संपलेल्या आठवड्यात १,८४२ मृत्यू झाले हाेते. वाढत्या रुग्णांचे कारण लसीकरणातील घट व डेल्टा व्हेरिएंट असे सांगितले जाते. म्हणूनच राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी संरक्षण विभागाला सैनिकांचहीे वेगाने लसीकरण करण्याची सूचना केली आहे. तअमेरिकेत ६९ टक्के ज्येष्ठांना किमान एक डाेस देण्यात आला आहे. परंतु दैनंदिन लसीकरण कार्यक्रमात घट झाली आहे. आता राेज ७.५ लाख डाेस दिले जात आहेत. संसर्गाचे प्रमाण वाढत असताना दरराेज ३९ लाख डाेस दिले जात हाेते.
जपान : टाेकियाेत आणीबाणीत वाढ, चार इतर प्रांतांतही लागू
जपानमध्ये दरराेज ९ हजारांहून जास्त नवे काेराेना रुग्ण आढळत आहेत. एका आठवड्यात ६१ टक्के नवे रुग्ण वाढले. त्यामुळे सरकारने टाेकियाेत ३१ आॅगस्टपर्यंत आणीबाणी लागू केली. पंतप्रधान याेशिहिदे सुगाने त्याची घाेषणा केली. ते म्हणाले, सरकारने टाेकियाेव्यतिरिक्त इतर चार प्रांतांतही आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. येथेही साेमवारपासून ३१ आॅगस्टपर्यंत आणीबाणी लागू केली. चिबा, कानागावा, सैतामा, आेसाका अशी आणीबाणी लागू असलेल्या प्रांतांची नावे आहेत.
चीन : १३ शहरांत संसर्ग वेगात, नानजिंगमध्ये ९३ लाखांची तपासणी
चीनच्या सहा प्रांतांतील १३ शहरांत काेराेनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढू लागला आहे. त्यात राजधानी बीजिंगचाही समावेश आहे. त्याची सुरुवात नानजिंगपासून झाली हाेती. २० जुलै राेजी नानजिंगच्या विमानतळावर काेराेनाचा एक रुग्ण आढळून आला हाेता. त्यानंतर तपासात २०० लाेक बाधित आढळले. नानजिंगहून ११ आॅगस्टपर्यंत उड्डाणे रद्द करण्यात आली. नानजिंगची परिस्थिती वुहानमधील संसर्गाच्या सुरुवातीच्या काळातील परिस्थितीसारखी गंभीर आहे. म्हणूनच सरकारने नानजिंगच्या ९३ लाख लाेकसंख्येची तपासणी होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.