आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महामारीचे संकट:अमेरिकेमध्ये 40 राज्यांत काेराेना कहर; 40 दिवसांत रुग्ण दुपटीवर

वाॅशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या इलिनॉयमध्ये शाळांत मास्क अनिवार्य केल्याच्या निषेधार्थ मोर्चा.
  • अमेरिका, युराेपपासून पूर्व आशियापर्यंत परिस्थिती गंभीर

अमेरिकेच्या ५० पैकी ४० राज्यांत गेल्या १४ दिवसांपासून काेराेना संसर्गाचा वेग वाढला आहे. या राज्यांत एकाच दिवसात सर्वाधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात कॅलिफाॅर्निया, फ्लाेरिडा, टेक्सास, जाॅर्जिया, उत्तर कॅरोलिनाचा समावेश आहे. काेविड ट्रॅकिंग प्रकल्पाच्या म्हणण्यानुसार भरती काेराेना रुग्णांच्या बाबतीत रुग्णालयांची परिस्थिती एप्रिलसारखी झाली आहे. सध्या ५९ हजार ६७० काेराेना रुग्ण भरती आहेत. एप्रिलच्या मध्यावर रुग्णालयात ५९ हजार ९४० काेराेना रुग्ण भरती हाेते. जूनच्या मध्यावर २८ हजार रुग्ण हाेते. काेराेनामुळे मृतांमध्ये आणखी वाढ झाली. शुक्रवारी सलग चाैथ्या दिवशी देशात ११०० रुग्णांचा मृत्यू झाला.

एकट्या साऊथ कॅराेलिनामध्ये शनिवारी ८० मृत्यू झाले. सुमारे ३० राज्यांत मृतांचा आकडा असाच वाढत आहे. टेक्सासमधील स्टारर काैंटी हा हाॅटस्पाॅट ठरला. येथे एक लाख लाेकांमागे २ हजार ३५० रुग्ण आहेत. टेक्सास व ह्यूस्टनसारख्या शहरांच्या तुलनेत ही संख्या खूप जास्त आहे. स्टारर काैंटीच्या एकाही रुग्णालयात काेराेना रुग्णांवर उपचाराची सुविधा नाही. प्रशासनाने लष्करी आराेग्य कर्मचाऱ्यांना व्हेंटिलेटर व इतर उपकरणांसह स्टारर काैंटीला रवाना केले आहे.

ब्रिटन : सरकारने स्पेन प्रवास टाळण्याचा दिला सल्ला, दुसऱ्या लाटेची शंका
लंडन । ब्रिटनने प्रवासाच्या दृष्टीने सुरक्षित देशांच्या यादीतून स्पेनला वगळले आहे. त्याचबराेबर नागरिकांनादेखील स्पेन पर्यटन टाळण्याचा सल्ला दिला आहे. काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही सूचना केली. स्पेनमध्ये सुट्या साजऱ्या करून येणाऱ्यांना स्वत: क्वॉरंटाइन करावे लागेल. स्पेनमध्ये दाेन दिवसांत ५ हजारांहून जास्त रुग्ण आढळून आले आहेत. स्पेनमध्ये संसर्गाची दुसरी लाट येणे शक्य आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत २ लाख ९८ हजार ६८१ रुग्ण आढळले, तर ४५ हजार ७३८ जणांचा मृत्यू झाला.

उत्तर काेरिया : काेराेनाच्या भीतीने आणीबाणी, केसाँग शहरात लाॅकडाऊन
सेऊल । काेराेनाच्या भीतीने उत्तर काेरियात पहिल्यांदाच आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण काेरियाच्या सीमेजवळील केसाँग शहरात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. देशाचे नेते किम जोंग उन म्हणाले, बहुदा क्रूर विषाणू देशात घुसला आहे. ही गंभीर स्थिती आहे. गेल्या आठवड्यात दक्षिण काेरियातील संशयित काेराेना रुग्ण बेकायदा उत्तर काेरियात घुसला हाेता. हा बाधित झाल्याचे स्पष्ट झाल्यास ताे देशातील पहिला रुग्ण ठरेल. देशात काेराेनाचा एकही रुग्ण नसल्याचा दावा उत्तर काेरियाने नेहमी केला.