आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाँगकाँगमध्ये भारतीय:येथे लॉकडाउन नसतानाही कोरोना नियंत्रणात! रिस्टबँड असल्याने कुणीच मोडू शकत नाही आयसोलेशनचे नियम

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हाँगकाँगमध्ये लॉकडाउन नसतानाही कोरोना नियंत्रणात कसा, भारतीयांनी सांगितले...

कोरोना व्हायरसचे पहिले प्रकरण डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये समोर आले होते. पाहता-पाहता हा व्हायरस जगभरात पसरला. यामुळेच जगभरात लॉकडाउन घोषित करावे लागले आहे. परंतु, एकेकाळी कोरोनाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या चीनच्या वुहान शहरापासून अवघ्या 919 किमी दूर हाँगकाँगमध्ये लॉकडाउन नाही. तरीही या शहरात कोरोना नियंत्रणात आहे. काही ठिकाणी ठराविक निर्बंध वगळता येथे सर्व काही सुरळीत सुरू आहे. 74 लाख लोकसंख्या असलेल्या हाँगकाँगमध्ये सध्या लॉकडाउन पूर्णपणे हटवण्यात आले आहे. त्यामुळेच हाँगकाँगचे उदाहरण जगभरात दिले जात आहे. एप्रिल महिन्यात एक जर्नल 'द लँसेट' मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, नॉन फार्मासिटिकल इंटरव्हेंशन जसे की, सीमा प्रतिबंध, क्वारंटाइन, आयसोलेशन, डिस्टन्सिंग आणि लोकांच्या वागण्यातील बदल यामुळे कोरोनाचा फैला रोखण्यात हाँगकाँग यशस्वी ठरले.

मूळचे जयपूर येथील असलेले राहुल गांधी गेल्या 7 वर्षांपासून हाँगकाँगमध्ये आहेत. ते केजीके ग्रुपमध्ये काम करतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, 2002 मध्ये सीव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स) ने चीनवर हल्ला चढवला होता. त्यावेळी लोक व्हायरसपासून बचाव करण्याची पद्धत शिकले होते. तीच आता कामी येत आहे. राहुल यांच्या मते, या ठिकाणी सरकारला लोकांना काही समजावून सांगण्याची गरज पडली नाही. लोकांना स्वतः याची जाणीव होती. चीनमध्ये व्हायरसचा पत्ता लागताच हाँगकाँगने सीमा सील केल्या होत्या. चीनमध्ये ये-जा पूर्णपणे बंद करण्यात आली.

राहुल सांगतात, "भारतात मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. पण, या ठिकाणी लोकांना माहिती थेट सरकारकडूनच दिली जाते. त्यामुळे एकत्रित येणे स्वतःहून बंद केले होते.

सतनाचे असलेले हेमंत त्रिपाठी सुद्धा हाँगकाँगमध्ये काम करत आहेत. ते टेलस्ट्रा कंपनीत सोल्यूशन आर्किटेक्ट आहेत. हाँगकाँगमध्ये कोरोना कसा थांबला यावर बोलताना ते म्हणाले, येथे बहुतांश लोक मास्क वापरतात. मास्क शिवाय कुणीच दिसत नाही. अधिक गर्दी असलेल्या ठिकाणी सुरुवातीपासूनच लोक मास्क वापरताना दिसून येतात. पहिल्या दिवसापासूनच येथे सक्तीने नियम पाळण्यात आले. आता लोक मेट्रोमध्ये सुद्धा बिंधास्त प्रवास करत आहेत. ते केवळ मास्क वापरून वेळोवेळी सॅनिटायजरने हात स्वच्छ करत असतात. लिफ्ट किंवा कुठल्याही सार्वजनिक गोष्टीचा वापर करताना ते टीशू पेपर वापरतात. हे टीशू पेपर इकडे-तिकडे उगीच फेकून दिले जात नाहीत. अॅपच्या माध्यमातून लोकांना मदत केली जाते.

हेमंत सांगतात, की भारतात सुद्धा अॅप लाँच करण्यात आले होते. पण, हाँगकाँगमध्ये ते खूप आधी करण्यात आले. प्रत्येकाने ते डाउनलोड केले होते आणि धोक्याची लोकांना स्वतः जाणीव होती. सरकारने तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला. क्वारंटाइनमध्ये लोकांच्या हातात बँड बांधण्यात आले होते. त्यामध्ये जीपीएस आणि अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टिम होते. यातून लोक कुठे आहेत याची प्रशासनाकडे माहिती होती. अशात आयसोलेशनचे नियम कुणीही मोडू शकत नव्हते. कुणी मोडल्यास इतर लोक त्याचा व्हिडिओ करून प्रशासनाला माहिती देत होते.

हेमंत यांनी सांगितल्याप्रमाणे, विमानतळ, बंदरे ताबडतोड बंद करण्यात आली होती. शाळा, क्लब, जिम आणि पार्लर सुद्धा बंद करण्यात आले. पण, पूर्णपणे लॉकडाउन कधीच लागू करण्यात आला नाही.

व्हेपोराइज्ड हायड्रोजन परॉक्साइड (VHP) रोबोट्सपासून इंटेलिजेंट स्टेरलायजेशन रोबोट्सपर्यंतचा वापर विमानतळ, रेल्वे स्टेशनवर करण्यात आला. यात यूव्ही लाइट, 360 डिग्री स्प्रे नोझल्स आणि एअर फिल्टर्सचा वापर करून जर्म्स आणि व्हायरस नष्ट करण्यात आले. यासोबतच फुल बॉडी डिसइंफेक्शन चॅनल फॅसिलिटी, ऑटोनॉमस क्लीनिंग रोबोट्स देखील वापरण्यात आले. त्यामुळेच, कोरोना विरोधात हाँगकाँग मॉडेल एक आदर्श मॉडेल मानले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...