आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Corona In America | In Cities Like New York, Corona Infections Decreased, But Rural Areas Became Infected

अमेरिकेतील संकट:न्यूयॉर्कसारख्या शहरांमध्ये संसर्गात घट, ग्रामीण भागात बाधित वाढले; लॉकडाऊन शिथिल झाल्याने दुष्परिणाम

न्यूयॉर्क3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अॅरिझोना प्रांताच्या एका मास्क कारखान्याला भेट दिली. तेथील कामकाजाचे स्वरूप पाहिले. परंतु ट्रम्प व सोबतच्या सहकाऱ्यांनी मास्क परिधान केलेला नव्हता. - Divya Marathi
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अॅरिझोना प्रांताच्या एका मास्क कारखान्याला भेट दिली. तेथील कामकाजाचे स्वरूप पाहिले. परंतु ट्रम्प व सोबतच्या सहकाऱ्यांनी मास्क परिधान केलेला नव्हता.
  • १० भागांत लाखामागे ३ हजारांहून जास्त रुग्ण आढळले

भलेही न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा वेग कमी झाला असला तरी अमेरिकेच्या इतर भागांतील संसर्गात वाढ होत चालली आहे. न्यूयॉर्कमध्ये पहिल्या तीन आठवड्यांत सुरुवातीला प्रति एक लाख लोकांमध्ये सरासरी ९.३ टक्के लोक बाधित आढळून आले होते. परंतु आता हे प्रमाण ८.६ टक्क्यांवर आले आहे. उर्वरित अमेरिकेत हे प्रमाण एक लाखामागे ६.२ टक्क्यांवर आले होते. ते आता ७.५ टक्के वाढले आहे. त्यात ग्रामीण भागातील वस्त्यांचा जास्त समावेश आहे. संशोधन संस्थेच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या मध्य-पूर्व व दक्षिणेच्या भागात विषाणू संसर्ग जास्त वाढू लागला आहे. शिकागोच्या कुक भागात दररोज सरासरी २ हजार व लॉस एंजलिसमध्ये १ हजार रुग्ण आढळून आले आहेत. १८ एप्रिलनंतर संसर्ग दुपटीने वाढत चालला आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक डॉ. जुआे फेंग झांग म्हणाले, केवळ तपासण्या वाढल्याने नवे बाधित वाढले असे नाही. विनातपासणीच्या लोकांची संख्या जास्त असू शकते. कन्सासमध्ये शावनी भागातील आरोग्य विभागाचे संचालक लिंंडा आेच म्हणाले, कोणतीही चूक करू नका. हा संसर्ग आमच्या समुदायात बाहेर वाढू लागला आहे. लोकांना पुन्हा बाहेर निघणे आणि व्यवहार सुरळीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामागे हेच कारण आहे. पहिल्या आठवड्यापेक्षा जास्त वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव होत असावा, असा आमचा अंदाज आहे. अहवालानुसार ग्रामीण भाग अचानक कोरोनाचे हॉटस्पॉट होत चालले आहेत. नर्सिंग होम, मीट पॅॅकिंग प्रकल्प, तुरुंग व गरीब वस्त्यांमध्ये कोरोना वाढत चालला आहे. अमेरिकेत आतापर्यंत १२ लाख ३८ हजार ६६२ रुग्ण समोर आले .

‘मलेरिया प्रतिबंधक आैषधीवर संशोधन होऊ दिले नाही’

अमेरिकेतील एक बडतर्फ संशोधक रिक ब्राइट यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन भारत, पाकिस्तानातून आयात करणाऱ्या मलेरियाविरोधी आैषधी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा तपास एफडीएला करू दिलेला नाही. याबाबत संशोधकांचा अंदाज, सल्ला याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ब्राइट यांनी व्हिसलब्लोअर्सच्या सुरक्षेसंबंधी कार्यालयात तक्रार दाखल केली. ब्राइट बडतर्फीच्या काळात बायोमेडिकल अॅडव्हान्स्ड रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्थेचे ते प्रमुख होते. आैषधी तयार झालेल्या कारखान्यांचेदेखील निरीक्षण करायला हवे होते. आैषधीत मिश्रण असू शकते. अमेरिकेने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या सुमारे ५ कोटी गोळ्यांची आयात केली आहे

.