आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतर्गत अहवाल:अमेरिकेत जूनपर्यंत रोज संसर्गाचे दोन लाख नवे रुग्ण, ३ हजार मृत्यूंची भीती

वॉशिंग्टन3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
न्यूजर्सी येथे एका मृतदेहाला दफन करताना अधिकारी. - Divya Marathi
न्यूजर्सी येथे एका मृतदेहाला दफन करताना अधिकारी.
  • बाधितांबद्दल धक्कादायक अंदाज, मृत्यूंचा आकडा दडपण्याचे प्रयत्न

अमेरिका व डोनाल्ड ट्रम्प प्रशासनासाठी आगामी जून महिन्यात कोरोना संकट जास्त भयंकर रूप घेणारे ठरू शकते. ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत अहवालानुसार जूनमध्ये अमेरिकेत दररोज २ लाख नवे रुग्ण येतील व सुमारे ३ हजार मृत्यू होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये विनापरवानगी वक्तव्य करण्यास अधिकाऱ्यांना रोखण्यात आले आहे. सध्या अमेरिकेत संसर्गामुळे दररोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या १७५० आहे. त्यात ७० टक्क्यांनी वाढ होऊ शकते. दुसरीकडे संसर्गामुळे दररोज येणारी रुग्णसंख्या २ लाखांपर्यंत जाऊ शकते. आतापर्यंत दररोजची संख्या सुमारे २५ हजारांवर अाहे. फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट संस्थेने तयार केलेल्या पब्लिक मॉडेलच्या आधारे हा भयावह अंदाज वर्तवण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील सातत्याने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे वेगवेगळे आकडे सांगू लागले आहेत. त्यामागेही हे मॉडेल कारणीभूत असल्याचे मानले जाते. गेल्या सात आठवड्यांपासून सर्व राज्यांचा कारभार ठप्प आहे. त्याचा दुष्परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे.

४ ऑगस्टपर्यंत मृत्युसंख्या वाढेल, तज्ञ संस्थेचा दावा

वॉशिंग्टन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्सच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या सुरुवातीलाच अमेरिकेत संसर्गामुळे १ लाख ३५ हजार जणांना प्राण गमवावे लागतील. ही संख्या गेल्या १७ एप्रिलला झालेल्या मृत्यूंच्या दुप्पट आहे. ४ ऑगस्टपर्यंत ६० हजार ३०८ मृत्युमुखी पडले होते.

११ मेपर्यंत सर्व ३१ राज्यांत लोकांची वर्दळ वाढली आहे. त्याचबरोबर फिजिकल डिस्टन्सिंगलादेखील नाकारले आहे. त्यामुळे संसर्ग वाढेल आणि आकड्यांत बदल दिसून येईल, असे तज्ञांचे म्हणणे आहे. संसर्गामुळे १ लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू शक्य आहे, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारी म्हटले होते. व्हाइट हाऊसने हा दावा फेटाळला.

अधिकाऱ्यांच्या वक्तव्यांवर निर्बंध

व्हाइट हाऊसच्या कोरोना विषाणू जलदकृती दलाचे अधिकारी म्हणाले, मीडिया तसेच काँग्रेसशी आम्ही केवळ मार्क मिडाे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच चर्चा करू शकतो. यासंबंधीच्या आदेशाचा ई-मेल न्यूयॉर्क टाइम्सकडे आहे. त्याशिवाय स्टेट, आरोग्य, मानवी सेवा इत्यादींशिवाय होमलँड सिक्युरिटी विभागाच्या अधिकाऱ्यांनादेखील समाेर येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.