आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Corona In Europe | England: A Rush To Get To Work As Soon As The Lockdown Opens, A Huge Crowd On The Train

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युरोपीय देश:इंग्लंड: लॉकडाऊन उघडताच कामावर येण्यासाठी झुंबड, रेल्वेत मोठी गर्दी

लंडन/ रोम/ माद्रिदएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • इटली आणि इंग्लंडमध्ये लाॅकडाऊन लागू झाल्यानंतर प्रथमच कमी मृत्यू
  • लॉकडाऊन दरम्यान रेल्वे कमी होत्या, आता ३००० वाढवल्या

इंग्लंडमध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच कोरोनामुळे एक दिवसात सर्वात कमी १७० मृत्यू झाले. इंग्लंडमध्ये २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला होता. त्या दिवशी काेरोनामुळे १८५ मृत्यू झाले होते. युरोपीय देशांमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त ३४६३६ मृत्यू इंग्लंडमध्येच झाले आहेत. येथे २४३६९५ रुग्ण आहेत. सरकारने लॉकडाऊनमध्ये सूट देत लोकांना कामावर येण्याचे सांगितले. यासाठी सोमवारपासून ३ हजार अतिरिक्त रेल्वे सुरू करण्यात आल्या. इंग्लंडमध्ये लॉकडाऊनदरम्यान रोज सुमारे १२ हजार रेल्वे धावत होत्या. त्या वाढवून १५ हजार करण्यात आल्या आहेत. अशा २४ हजार रेल्वे धावतात.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये सूट असली तरी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक आहे. यामुळेच लोक कामावर परतू लागल्याने त्यांच्यासाठी रेल्वेही कमी पडल्या. अतिरिक्त रेल्वेंमुळे केवळ १५ टक्के क्षमता वाढली.

दरम्यान, द ऑब्झर्व्हर वृत्तपत्राच्या सर्वेक्षणानुसार इंग्लंडमध्ये ४२ टक्के लोकांना वाटते की, सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरले. तर ३९ टक्केे लोकांनी सरकारच्या कामाचे कौतुक केले. तिकडे इंग्लंडच्या लगतच्या स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडमध्ये कडक लॉकडाऊन आहे.

स्पेन: कमी बाधित भागात हाॅटेल, बार, सलून उघडले

स्पेनमध्ये कमी बाधित भागात लॉकडाऊनमध्ये सूट दिली आहे. येथे कोरोनामुळे मृतांचा आकडा कमी होत आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला. मात्र अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, फिजिकल डिस्टन्सिंगसारखे नियम पाळले नाहीत तर कोरोनाचा दुसरा टप्पा येऊ शकतो. येथे सोमवारपासून हॉटेल, बार, कॅफे, सलून आणि इतर दुकाने उघडली. २७७७१९ रुग्ण, तर २७६५० मृत्यू झाले आहेत.

इटली : चर्च उघडले, डिस्टन्सिंग पाळावे लागेल

इटलीतही लॉकडाऊन लागू झाल्यानंतर पहिल्यांदा सर्वात कमी १४५ मृत्यू झाले. येथे १० मार्चला लॉकडाऊन सुरू झाले होते. त्या दिवशी सर्वात कमी १६८ मृत्यू झाले होते. इटलीत आतापर्यंत २२५४३५ रुग्ण आढळले आहेत. ३१९०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत बार, सलून, संग्रहालय, वाचनालये सुरू झाली. सोमवारपासून चर्चही उघडले, मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल.

इतर: बेल्जियम, ग्रीस, पोर्तुगालमध्ये शाळा सुरू

बेल्जियममध्ये सोमवारपासून शाळा, संग्रहालय, प्राणिसंग्रहालय सुरू झाले. वाचनालयाची सुविधा ऑनलाइन असेल. बेल्जियममध्ये अातापर्यंत ५५५५९ रुग्ण आढळले आहेत. ९०८० मृत्यू झाले आहेत. ग्रीस आणि पोर्तुगालमध्ये प्राथमिक शाळा, हॉटेल, कॅफे उघडले. ग्रीसमध्ये २८३४ रुग्ण आहेत तर १६३ मृत्यू. पोर्तुगालमध्ये २९२०९ रुग्ण तर १२३१ मृत्यू. पोलंडमध्ये सलून उघडली. १८७४६ रुग्ण आहेत.

बातम्या आणखी आहेत...