आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकट:भारत, इंग्लंडमध्ये संसर्ग सोबत सुरू झाला, मात्र स्थिती वेगळी, 45 दिवसांपर्यंत केवळ लक्षणांवरून ठरले कोरोनाचे रुग्ण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
पीएम बोरिस जॉन्सन यांनी सांगितले की, बांधकामाशी संबंधित कामगार घरून काम करू शकत नसतील तर त्यांना कामाच्या ठिकाणी जाता येईल. - Divya Marathi
पीएम बोरिस जॉन्सन यांनी सांगितले की, बांधकामाशी संबंधित कामगार घरून काम करू शकत नसतील तर त्यांना कामाच्या ठिकाणी जाता येईल.
  • रुग्णांना आनंद : प्रत्येक बेडवर मनोरंजनासाठी मॉनिटर

डॉ. ज्ञानेश नामजोशी, कार्डिअोथोरेसिस अॅनेस्थेटिक्स, बासिलडोन

इंग्लंडमध्ये ४५ दिवसांपर्यंत तपासणी न करता केवळ लक्षणांच्या आधारे कोरोना रुग्ण ठरत राहिले. इंग्लंडमध्ये पहिला रुग्ण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आढळला, मात्र ओळख आरटी-पीसीआर तपासणीतून झाली नाही. लक्षणांच्या आधारे सीटी स्कॅन व चेस्ट एक्स-रे करून कोरोनाची पुष्टी करण्यात आली होती. असे १५ मार्चपर्यंत सुरू होते. तोपर्यंत ११०० रुग्ण आढळले होते. २१ जणांचा मृत्यू झाला होता. मार्चअखेरीस आरटी-पीसीआर किट आले. भारतात पहिला कोरोना रुग्ण ३० जानेवारीला आढळला. भारताने आरटी-पीसीआर तपासणी करत रुग्ण ओळखला. 

आज भारतात ६७ हजारांपेक्षा जास्त प्रकरणे आहेत. इंग्लंडमध्ये सुमारे २.२० लाख प्रकरणे आहेत. इंग्लंडमधील पहिले दोन रुग्ण चीनचे दोन प्रवासी होते. त्यानंतर एक व्यापारी, जे चीन आणि हॉलंडचा दौरा करून आले होते, त्यांना हा आजार झाला. मार्च मध्यात सरकारने या आजाराचे सामुदायिक प्रसार होत असल्याचे सांगितले. हा संसर्ग भीतिदायक नसेल असे सुरुवातीला तज्ञांना वाटत होते. यामुळे लॉकडाऊन केला नाही. हर्ड इम्युनिटीची जोखीम घेण्यात आली, जी धोकादायक ठरली. भले रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली असली तरी ती सर्वोच्च मानली जात नाहीये.

कोरोना योद्धा : आरोग्य कर्मचाऱ्यांना हॉटेल मोफत जेवण देत आहेत

सरकारने २० दिवसांत एका मैदानात ४००० आयसीयू बेड असणारे रुग्णालय उभारले. आयसीयूत सुमारे ७० टक्के रुग्णांचा मृत्यू होतोय. येथे सुमारे १५०० रुग्णच गंभीर आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी घरी जात नाहीत. ते रुग्णालयाच्या शेजारच्या घरांमध्ये राहत आहेत. हॉटेल त्यांच्यासाठी मोफत जेवण पोहोचवत आहेत. जेवण पोहोचवण्याची तारीख आधीच निश्चित करण्यात आली आहे.

रुग्णांना आनंद : प्रत्येक बेडवर मनोरंजनासाठी मॉनिटर

रुग्णांना कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी नाही. त्यांच्या मनोरंजनासाठी प्रत्येक बेडवर एक मॉनिटर लावण्यात आला आहे. त्यावर रुग्ण आपल्या आवडीचा कार्यक्रम बघूू शकतो. दुसऱ्या रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून हेडफोनही आहेत. इंग्लंडमध्ये लोकांची कोणत्या ना कोणत्या डाॅक्टरांकडे नोंदणी आहेच. डॉक्टर लॉकडाऊनमध्ये फोनवरच सल्ला देत रुग्णाच्या घरी औषधी पोहोचवण्याची सोय करतात.

बातम्या आणखी आहेत...