आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महामारी:उत्तर चीनमध्येही काेराेनाचा संसर्ग; 1.1 काेटी लाेकसंख्येचा प्रांत ठप्प

बीजिंग3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नियंत्रणाचा दावा करणारे चीनवर संकट, टाेकियाे, परिसरात आणीबाणी

जगभरात काेराेनाच्या फैलावास कारणीभूत ठरलेल्या चीनने अलीकडे महामारीवरील नियंत्रणाचा दावा केला हाेता, परंतु ताेही फाेल ठरला असून तेथील परिस्थिती आणखी बिघडू लागली आहे. हेबेई प्रांतात अनेक ठिकाणी नवे बाधित समाेर आले आहेत. त्याशिवाय या प्रांतातील १.१ काेटी लाेकसंख्येच्या शिजियाझुआंग शहरात लाॅकडाऊन लागू करावा लागला.लाॅकडाऊनदरम्यान शहरातील नागरिकांना शहराची सीमा आेलांडण्याची परवानगी नाही. ५ हजार तपासणी केंद्रेही तयार करण्यात आली आहेत. त्याद्वारे नागरिकांची तपासणी केली जाऊ शकेल. अशाच प्रकारच्या कडक नियमांच्या साहाय्याने देशातील इतर भागांतील संसर्ग राेखण्यात चीनला यश आले आहे. चीनमध्ये गेल्या २४ तासांत प्रचंड नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या पाच महिन्यांत एकाच दिवसात सर्वाधिक रुग्ण येण्याची ही पहिलीच वेळ ठरली. चीनमध्ये एकूण रुग्ण ८७, २७८ आहेत. ४,६३४ एवढी मृतांची संख्या आहे. गाँगडाँग प्रांतात दक्षिण आफ्रिकेतील विषाणूचा स्ट्रेनही सापडला आहे.

जपानमध्ये आणीबाणी लागू
जपानमध्ये सलग संसर्गाच्या बाबतीत वाढ झाल्याने टाेकियाे आणि परिसरातील तीन प्रांतांत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. राजधानीत दरराेज अडीच हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळून येत आहेत. आणीबाणी ७ फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. जपानमध्ये गेल्या चाेवीस तासांत ६,०७६ नवे रुग्ण आढळून आले.

युराेपच्या २२ देशांमध्ये नवा स्ट्रेन, आरोग्य यंत्रणेवर ताण
युराेपच्या २२ देशांत ब्रिटनमधील नवा स्ट्रेनचा संसर्ग आढळून आला. जागतिक आराेग्य संघटनेनुसार नव्या विषाणूचा वेगाने फैलाव हाेत आहे. फ्रान्समध्ये एका दिवसात २५ हजारांहून जास्त रुग्ण आढळून आले. येथील रुग्णांवर उपचारासाठी दाखल हाेण्यासाठी दबाव वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला.

लॉकडाऊन अचानक हटवणार नाही : जॉन्सन
ब्रिटनमध्ये गेल्या २४ तासांत एप्रिलनंतर मृत्यूचा आकडा प्रचंड वाढला आहे. येथे एका दिवसात १,१६२ हून जास्त लाेकांचा मृत्यू झाला. ब्रिटनमध्ये तिसऱ्यांदा लाॅकडाऊन लागू झाला आहे. देशातील लॉकडाऊन अचानक रद्द केला जाणार नाही, असे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्पष्ट केले. एकूण ७८, ५०८ मृत्यू झाले.

बातम्या आणखी आहेत...