आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तज्ज्ञांचा दावा:इम्यून सिस्टीमला अलर्ट करणाऱ्या जीन्सला कोरोना व्हायरस ब्लॉक करत आहे

वॉशिग्ंटनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यूयॉर्कच्या आयकॉन स्कूल ऑफ मेडिसीनच्या तज्ज्ञांचा संशोधनात दावा
  • संशोधकांच्या मते, संसर्ग झाल्यानंतर जनुकांचा प्रतिसाद खूप मंदावतो

कोरोना व्हायरसपासून बचाव करणाऱ्या जीन्सला हा व्हायरस ब्लॉक करत आहे. असा दावा न्यूयॉर्कच्या आयकान स्कूल ऑफ मेडिसिनच्या व्हायरस तज्ज्ञांनी आपल्या संशोधनात केला आहे. संशोधकांचा दावा आहे की, कोरोना व्हायरसला रोखून, त्याबद्दल इम्यून सिस्टीमला अलर्ट करणाऱ्या जनुकांवर हा व्हायरस आक्रमण करत आहे. यातून व्हायरस वेगाने शरीरात आपली संख्या वाढवतो आणि अवयवांना मोठे नुकसान पोहचवतो.

दोन जनुकांचा समुह संक्रमण रोखतो

संशोधकांनी सांगितल्यानुसार, मानवाच्या शरीरात दोन जनुकांचा समुह असतो. एक जीन व्हायरसला वाढण्यापासून रोखतो आणि दुसरा इम्यून सिस्टीमला अलर्ट करुन, व्हायरसला मारण्याचा संदेश देतो. कोरोना व्हायरस शरीरात घुसल्यानंतर सर्वात आधी या दोन जनुकांवर हल्ला करतो.

संशोधकांनी जीनचे नाव 'कॉल टू आर्म' म्हटले

संशोधकांनी जनुकांच्या एका समुहाचे नाव 'कॉल टू आर्म' सांगितले आहे. सेल जर्नलमध्ये प्रकाशित शोधानुसार, याला समजन्यासाठी मानवाच्या फुफ्फुसांच्या पेशी आणि संक्रमित प्राण्यांचा अभ्यास केला गेला. यात संसर्गापासून बचाव करणार्‍या जीन्सचा दिलेला प्रतिसाद खूप हळू होता.

एका वेळेला व्हायरस अनियंत्रित होतो

संशोधकांच्या मते, संक्रमित व्यक्तीच्या फुफ्फुसात व्हायरस आपली संख्या वाढवण्याचे काम करतो. इथूनच संक्रमण इतक्या वेगाने वाढतो की, इम्यून सिस्टीमच्या वेगवेगळ्या पेशी (न्यूट्रोफिल्स, मैक्रोफेजेस, लिम्फोसाइट्स) आपल्या काम करेपर्यंत व्हायरस शरीरात पसरतो.

इम्यून सिस्टीम शरीराच्या विरोधात जातो

संशोधक आणि व्हायरस तज्ज्ञ डॉ बेंजामिन टेनोवर सांगतात की, संक्रमण वाढल्यानंतर अनेकवेळा इम्यून सिस्टीम शरीराविरोधात काम करणे सुरू करेत, याला सायटोकाइनिन स्टॉर्म म्हणतात. कोरोना व्हायरस ज्याप्रकारे आपला परिणाम दाखवत आहे, मागील 20 वर्षात असे काही पाहीले नाही.

औषधाने वाढता येईल इम्यून सिस्टीम

गंभीर परिस्थिती झाल्यावर रुग्णांना व्हेटिंलेटरवर ठेवले जाते. अशा परिस्थितीत व्हायरसला कंट्रोल करणे गरजेचे असते. अशा रुग्णांना इंटरल्यूकिन-6 आणि इंटरल्यूकिन-1 इनहिबिटरसारखे ड्रग देऊन इम्यून सिस्टीमला सुधारण्याचे काम करते.

बातम्या आणखी आहेत...