आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेविड-१९ ही आता महामारी राहिलेली नाही, असे जागतिक आराेग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. तत्पूर्वी या संसर्गजन्य आजाराचे स्वरूप जागतिक आराेग्यविषयक आणीबाणीसारखे मानले गेले हाेते.
संघटनेचे संचालक डाॅ. टेड्राेस अधनाेम घेब्रेयसस म्हणाले, आणीबाणी संपली याचा अर्थ काेराेना संपला असा हाेत नाही. गेल्या वर्षी काेराेनामुळे दर मिनिटास एका व्यक्तीने प्राण गमावले आहेत. जानेवारी २०२१ मध्ये काेविड संसर्गामुळे आठवड्याला मृतांचे सरासरी प्रमाण १ लाखावर हाेते. २४ एप्रिल २०२३ राेजी आठवड्याला ३५०० मृत्यूंची नाेंद झाली. लस, चांगल्या उपचारांची उपलब्धता, सामुदायिक इम्युनिटीमध्ये झालेली वाढ इत्यादींमुळे विषाणू संसर्ग राेखण्यात यश मिळाले आहे. डब्ल्यूएचओने २०२० मध्ये काेराेनाला आराेग्यविषयक आणीबाणी म्हणून जाहीर केले हाेते.
भारतातही संख्या घटतेय
भारतात सक्रिय रुग्णांची संख्या ३३,२३२ आहे. ३,६११ नवीन रुग्णांची नाेंद झाली. रिकव्हरी रेट ९८.७% आहे. भारतात काेविड लसींचे २२०.६६ काेटी डाेस दिले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.