आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्क:कोरोना लस घेतलेली असो वा नसो, डेल्टा व्हेरिएंट सारख्याच वेगाने संसर्ग फैलावतो, अमेरिकेत सीडीसीच्या अहवालात दावा

न्यूयॉर्क2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कांजण्यांप्रमाणे सहज पसरतो डेल्टा

कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएंट वेगाने फैलावतो हे तर स्पष्टच होते, पण तो लसीला चकवा देण्यात किती वेगवान आहे हे अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या (सीडीसी) अहवालातून दिसत आहे. त्यात म्हटले आहे की, डेल्टा कांजण्यांप्रमाणे फैलावतो. त्यामुळे त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. डेल्टा व्हेरिएंट लस घेतलेल्या लोकांतही तेवढ्याच वेगाने फैलावतो, जेवढा लस न घेतलेल्या लोकांमध्ये. हीच बाब वैज्ञानिकांत चिंतेचे कारण ठरली आहे. त्यामुळे तेथे लस घेतलेल्या लोकांनाही पुन्हा मास्क अनिवार्य केला आहे. सीडीसीच्या संचालक डॉ. रॉशेल व्हॅलेन्स्की यांनी सांगितले की, डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोना इबोलापेक्षाही वेगाने फैलावणारा विषाणू ठरला आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे की, अमेरिकेत रोज ७५ हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत. त्यापैकी ३५ हजार रुग्णांनी लस घेतलेली आहे. लस घेतलेले लोक डेल्टामुळे फक्त संक्रमितच होत नाहीत, तर त्यांच्याकडूनही पुढे तेवढ्याच वेगाने संक्रमण होत आहे, जेवढे लस न घेतलेल्या रुग्णांकडून होत आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीमुळे मृत्यूची शक्यता १० पट कमी
लस अमेरिकेत संसर्ग रोखण्यास पूर्णपणे यशस्वी ठरलेली नाही. पण संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूची शक्यता १० पट कमी करत आहे. ज्या लोकांनी लस घेतलेली नाही त्यांच्यात कोरानामुळे मृत्यूचा दर २ टक्के आहे, तर लस घेतलेल्या लोकांत मृत्युदर ०.२ टक्के आहे. म्हणजे लस घेतली नसेल तर १००० पैकी २० रुग्णांचा मृत्यू होत आहे, तर लस घेतलेल्या १००० रुग्णांपैकी फक्त दोन लोकांचा मृत्यू होत आहे.

बातम्या आणखी आहेत...