आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वॉशिंग्टन:अमेरिकेत कोरोनाने 2 लाखांवर मृत्यू; 20 हजार खुर्च्या रिकाम्या ठे‌वून श्रद्धांजली

वॉशिंग्टन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत कोरोनाने 2 लाखांवर मृत्यू

छायाचित्र व्हाइट हाऊसमधील इलिप्स लॉनचे आहे. येथे कोरोनामुळे आपले प्राण गमावणाऱ्या दोन लाख अमेरिकी नागरिकांच्या आठवणीत २० हजार खुर्च्या रिकाम्या ठेवण्यात आल्या. प्रत्येक खुर्ची १००० लोकांच्या आठवणीत ठेवण्यात आली होती. रविवारी झालेल्या या आयोजनात मृतांचे कुटुंबीय सहभागी झाले. कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील सहभागी होणार होते. मात्र ते कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाही. ६ महिन्यांत ७४ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले असून २.१० लाख मृत्यू झाले आहेत.

ट्रम्प पॉझिटिव्ह; साडनफ्रोइडा शब्दाच्या सर्चमध्ये ३०,५००% वाढ
२ ऑक्टोबरला कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी कारमधून फिरताना दिसून आले. कारमध्ये त्यांच्यासोबत आणखी काही जण उपस्थित होते. आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यांनी या वेळी समर्थकांची भेटही घेतली. दुसरीकडे ट्रम्प पॉझिटिव्ह आल्यापासून अमेरिकेमध्ये ‘साडनफ्रोइडा’ (Schadenfreude) हा शब्द ट्रेंडमध्ये आहे. दुसऱ्या दु:खात आनंद शोधणे असा याचा अर्थ आहे. मागील तीन दिवसांपासून साडनफ्रोइडा शब्दाच्या सर्चमध्ये 30,500% वाढ झाली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser