आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या लॅबमधून लीक झाला कोरोना:दावा- पहिल्या केसच्या एक महिन्यापूर्वीच वुहानच्या लॅबचे 3 संशोधक आजारी पडले होते, तिघांमध्येही कोरोनाचे लक्षण दिसले होते

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना हा चीनचा मानवनिर्मित (मॅन मेड) व्हायरस असू शकतो. ही गोष्ट हळूहळू स्पष्ट होत आहे. पहिले ऑस्ट्रेलियन मीडियाने चीनमध्ये 2015 मध्ये कोरोनावर संशोधन झाल्याचा दावा केला होता. आता अमेरिकेच्या मीडियाने आपल्या अहवालात या विषाणूविषयी मोठा खुलासा केला आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार चीनने जग आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) पासून बरीच महत्त्वाची माहिती लपवली आहे.

अहवालानुसार, चीनने डब्ल्यूएचओला सांगितले होते की, कोरोनाची पहिली केस 8 डिसेंबर 2019 रोजी वुहानमध्ये आढळून आली होती. परंतु व्हायरस संक्रमणाची केस एक महिन्यापूर्वीच समोर आली होती. नोव्हेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या 3 संशोधकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजाराच्या वेळी तिन्ही डॉक्टरांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली होती. यानंतर वुहानच्या लॅबमधून हा विषाणू लीक झाल्याची शक्यता वाढली आहे.

या दाव्यात तथ्य का असू शकते?
अमेरिकन मीडियाचा हा अहवाल फेटाळून लावता येणार नाही. गेल्या वर्षी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाला अनेकदा जाहीरपणे 'चायनीज व्हायरस' म्हटले होते. ते म्हणाले होते- व्हायरस चीनच्या लॅबमध्ये तयार केले गेला आणि यामुळे जगातील आरोग्य क्षेत्र नष्ट होत आहे, बर्‍याच देशांची अर्थव्यवस्था हा व्हायरस हाताळू शकणार नाही. ट्रम्प यांनी असेही म्हटले होते की, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांकडे याचा पुरावा आहे आणि वेळ येईल तेव्हा जगासमोर घेऊन येऊ.

मात्र, ट्रम्प निवडणूक हरले आणि बायडेन प्रशासनाने अद्याप याबद्दल सार्वजनिकपणे काहीही सांगितलेले नाही. परंतु, ब्लूमबर्गने नुकतेच एका अहवालात असे निदर्शनास आणून दिले होते की, अमेरिका या प्रकरणाची अत्यंत जलद आणि गंभीरतेने चौकशी करीत आहे.

ऑस्ट्रेलियन मीडियाने दावा केला होता - 2015 पासून तयारी करीत आहे चीन
यापूर्वी ऑस्ट्रेलियन माध्यमांनीही असा दावा केला होता की, कोरोना विषाणू 2020 मध्ये अचानक आला नाही, चीन 2015 पासून त्याची तयारी करत होता. चीनी सैन्य मागील 6 वर्षांपासून कोविड-19 विषाणूला जैविक शस्त्र म्हणून वापरण्याचा कट रचत होते. 'द विकेंड ऑस्ट्रेलियन'ने आपल्या अहवालात हा खुलासा केला होता.

रिपोर्टमध्ये चीनमधील एका रिसर्च पेपरचा आधार घेण्यात आला होता. त्यात म्हटले आहे की,चीन मागील 6 वर्षांपासून सार्स विषाणूच्या मदतीने जैविक शस्त्रे बनवण्याचा प्रयत्न करीत होता. अहवालानुसार, चिनी शास्त्रज्ञ आणि आरोग्य अधिकारी 2015 मध्येच कोरोनाच्या वेगवेगळ्या स्ट्रेनवर चर्चा करत होते. त्यावेळी चिनी शास्त्रज्ञांनी सांगितले होते की, तिसऱ्या महायुद्धात हा विषाणू जैविक शस्त्र म्हणून वापरले जाऊ शकते. विषाणूला कसे हाताळले जाऊ शकते आणि साथीच्या रोगात कसे बदलले जाऊ शकते यावर देखील चर्चा झाली होती.

बातम्या आणखी आहेत...