आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंग्लंडमध्ये कोरोनामुळे कोमामध्ये गेलेल्या एका महिलेला व्हायग्राने जिवदान दिले आहे. मोनिका अल्मेडा (वय37) असे कोमातून बरे झालेल्या रुग्णाचे नाव आहे. मोनिकाला कोरोना आल्यापासून दोनदा लागण झाली होती. 28 दिवसांपासून कोरोनामुळे मोनिका कोमात गेल्या होत्या. व्हायग्राचा डोस दिल्यानंतर, मोनिका कोमामधून बाहेर आल्या. व्हायग्रा देण्याची कल्पना मोनिकासोबत काम करणाऱ्या एक नर्सने दिली होती.
'द सन'च्या रिपोर्टनुसार, मोनिका गेन्सबरो लिंकनशायर येथील रहिवासी असून, त्या एक परिचारिका आहेत. ऑक्टोंबरमध्ये कोरोना रुग्णाचे उपचार करता-करता मोनिकाला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मोनिकाची प्रकृती ढासळल्याने त्यांना रक्ताच्या उलट्या होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मोनिकावर उपचार केले असता, रुग्णालयातून काही दिवसांनी सुट्टी देण्यात आली.
16 नोव्हेंबरपासून मोनिका होती कोमातून
रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर मोनिकाला पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर पुन्हा काउंटी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मोनिकाची ऑक्सिजन पातळी खालवतच जात होती. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर 16 नोव्हेंबरपासून मोनिका कोमात गेल्या होत्या.
आता व्हायग्राबाबत नवीन संशोधन सुरू
मोनिका कोमात गेल्यापासून डॉक्टरांनी त्यांना शुद्धीत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र त्याचा कोणताही फायदा झाला नाही. डॉक्टर मोनिकाला व्हेंटिलेटरवरुन हटवण्याचे विचार करत होते, मात्र त्यापुर्वी व्हायग्रा देण्याचा निर्णय घेण्यात आला. व्हायग्राचा मोठा डोस दिल्यानंतर मोनिका कोमात बाहेर आली. आता वैज्ञानिक व्हायग्राबाबत संशोधन करत आहे. व्हायग्राचा वापर नायट्रिक ऑक्साईडसारखा केला जाऊ शकतो त्यामुळे रक्तात ऑक्सिजनची मात्रा वाढण्यास मदत होईल.
व्हायग्राने मला वाचवले
कोमातून बाहेर आल्यानंतर मोनिका म्हणाल्या की, व्हायग्राने मला जिवदान दिले आहे. व्हायग्राने माझ्या एयर वेभ्सला उघडले, त्यामुळे माझे फुफुस काम करायला लागेले. मला दमाचे आजार असून, त्यामुळे माझी ऑक्सिजन पातळी नेहमी कमी जास्त होत राहते. मी कधी विचारही केला नव्हता की, मी वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी आजारी पडू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.