आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान:तीन महिन्यांनंतर पुन्हा होऊ शकतो कोरोना, पहिले प्रकरण आले समोर

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते का? हा प्रश्न आता जवळपास सर्वांच्या मनात उपस्थित होत चालला आहे. बहुतांश वैज्ञानिकांच्या मते, एकदा शरीरात अँटिबॉडीज तयार झाल्यानंतर काही महिन्यांपर्यंत बाधा झालेली व्यक्ती सुरक्षित असते. हार्वर्ड विद्यापीठाचे इम्युनोलॉजिस्ट डॉ. मायकल मीना यांनी सांगितले, कोरोनाबाधित व्यक्तीच्या शरीरात इम्यून मॉलिक्यूल तयार होतात. यालाच अँटिबॉडी म्हणतात.

या अँटिबॉडीज शरीरात दोन ते तीन महिने असतात. मात्र अशा व्यक्तीला अतिशय कमी काळात पुन्हा लागण होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. दुसरीकडे कोरोनामुक्त झालेल्यांना पुन्हा संसर्ग झाल्याच्या प्रकरणांमुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. यावर तज्ञांनी सांगितल्यानुसार, अशा व्यक्तींना जेव्हा पहिल्यांदा बाधा होते तेव्हा ते पूर्णपणे बरे झालेले नसतात.

पहिले प्रकरण आले समोर
चीनमधील जिंगझोऊ शहरामध्ये कोरोनातून मुक्त झालेल्या ६८ वर्षीय महिलेला सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा बाधा झाली. ऑगस्टमध्ये महिलेचा कोरोना अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला. यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वी ती ८ फेब्रुवारीला पॉझिटिव्ह आढळली होती.

बातम्या आणखी आहेत...