आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Corona New Varient Deltacron In Briten | Corona Deltacron First Case In Briten | Marathi News | Another Variant Of The Corona Was Found After The Omicron And Delta; The First Patient Found In 'this' Country

डेल्टाक्रॉनचा धोका:ओमायक्रॉन आणि डेल्टानंतर कोरोनाचा आणखी एक व्हेरिएंट आढळला; 'या' देशात आढळला पहिला रुग्ण

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाचा वेग काही प्रमाणात मंदावला असताना, आता आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. कोरोनाचे एका पाठोपाठ एक व्हेरिएंट समोर येत आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉननंतर आता कोरोनाचा आणखी एक नवीन विषाणू डेल्टाक्रॉन आढळला आहे. हा विषाणू डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून तयार झालेला एक हायब्रिड स्ट्रेन आहे. ब्रिटेनमधून या नव्या डेल्टाक्रॉन विषाणूचे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

ब्रिटेनमध्ये आढळला डेल्टाक्रॉन
ब्रिटेनमध्ये डेल्टाक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, UKHSA तज्ञांना सध्या हे देखील माहिती नाही की, कोरोनाचा हा नवीन विषाणू डेल्टाक्रॉन धोका किती आणि कोणाला आहे. सोबतच या नव्या विषाणूचे लक्षणे नेहमी काय आहेत आणि कोरोनाची लस यावर प्रभावशाली ठरेल का? याचा प्रश्न देखील UKHSA च्या तज्ञांकडे नाही.

डेल्टा आणि ओमायक्रॉनचा हायब्रिड व्हेरिएंट आहे डेल्टाक्रॉन
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक सुपर-सुपर-म्युटंट व्हायरस आहे, ज्याचे नाव BA.1 + B.1.617.2 आहे. तज्ञांनी सांगितले आहे की, हा विषाणू डेल्टा आणि ओमायक्रॉनचा बनलेला एक हायब्रिड स्ट्रेन आहे. जो गेल्या महिन्यात सायप्रसमधील संशोधकांनी पहिल्यांदा शोधला होता. त्यावेळी शास्त्रज्ञांनी ही प्रयोगशाळेतील तांत्रिक चूक असल्याचे मानले होते. मात्र आता ब्रिटनमध्ये डेल्टाक्रॉनची प्रकरणे समोर येत आहेत.

WHO चे काय म्हणणे आहे?

जागतिक आरोग्य संघटनने सांगितले आहे की, एखाद्या व्यक्तीला SARS-CoV-2 च्या विविध प्रकारांचा संसर्ग होणे शक्य आहे. याची अनेक उदाहरणे आहेत. या साथीच्या काळात लोकांना इन्फ्लूएंझा आणि कोविड-19 या दोन्हीची लागण झाली होती.

बातम्या आणखी आहेत...