आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Corona | Omicron | Marathi News | Coronavirus USA Brazil China Russia Update; Reported Cases And Deaths By Worldwide Today 8 Dec Latest Data

जगात ओमायक्रॉन:जर्मनीत कोरोनाचा स्फोट; एकाच दिवशी तब्बल 527 जणांचा मृत्यू, दक्षिण आफ्रिकेत 24 तासांत 383 नवे रुग्ण सापडले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मनीत पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे एकच दिवसात सुमारे 527 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 12 फेब्रुवारीनंतर मृत्यूचा हा आकडा सर्वात मोठा मानला जात आहे. जर्मनीत कोरोना या भयावह विषाणूने आतापर्यंत 1.04 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात 69 हजार 601 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. जर्मनीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 62.27 लाख एवढा झाला आहे. आतापर्यंत 52.25 लाख जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

दक्षिण आफ्रिकेत काय आहे स्थिती
दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन हा नवा विषाणू आढळला आहे. त्यानंतर तिथे रुग्णालयात रुग्ण भरती होण्याचे प्रमाण डब्बल झाले आहेत. नॅशनल इंस्टीट्यूट फॉर कम्युनिकेबल डिजीजने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 383 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेत एकाच दिवसात 13,147 रुग्ण आढळले आहे. ज्यातील 64% केसेस हे गौतेंग ( दक्षिण आफ्रिकेत सर्वात छोटे प्रांत) येथे सापडले आहे.

यूरोपमध्ये ही ओमायक्रॉनचा धोका
यूरोपियन आरोग्य एजेंसीने यूरोपात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. संस्थेचे म्हणणे आहे की, येत्या काही आठवड्यात यूरोपियन देशांमध्ये रुग्णालयात रुग्ण भरती आणि मृत्यूचे प्रमाण वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणावर जास्तीत जास्त भर द्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...