आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना महामारी:भारतात कोरोनामुळे 14 महिन्यांतच 1.19 लाख मुले अनाथ : द लॅन्सेट

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार म्हणाले होते- 3,621मुले अनाथ

कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या १४ महिन्यांतच भारतातील १.१९ लाख मुलांसह २१ देशांतील १५ लाखांवर अधिक मुलांनी आपले आई-वडील किंवा संगोपन करणारे आप्तेष्ट गमावले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रग अॅब्यूझ (एनआयडीए) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे (एनआयएच) हे अध्ययन प्रसिद्ध हेल्थ जर्नल द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झाले आहे.

अध्ययनातील दाव्यानुसार, कोरोनामुळे भारतात २५ हजार मुलांनी आई, तर ९०,७५१ मुलांनी वडील गमावले. यातील १२ हजार मुलांनी अाई-वडील दोघेही गमावले. जगभरातील अशा मुलांची संख्या ११.३४ लाख इतकी असून त्यांनी आई-वडील किंवा आजी-आजोबा गमावले आहेत. यातील १०.४२ लाख मुलांनी आई-वडील किंवा दोघेही गमावले आहेत.

सरकार म्हणाले होते- ३६२१ मुले अनाथ
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने ७ जून २०२१ रोजी सुप्रीम कोर्टात सांगितले होते की, १ एप्रिल २०२० पासून ५ जून २०२१ दरम्यान १५ महिन्यांत भारतात कोरोनामुळे ३,६२१ मुलांनी आई-वडील गमावले. २६,१७६ मुलांनी आई-वडील या दोघांपैकी एक पालक गमावला आहे, तर २७४ मुलांना त्यांच्या आई-वडिलांनी टाकून दिले.

अशा रीतीने ३०,०७१ मुले महामारीमुळे संकटात असल्याची नोंद केली गेली. यातील १५६२० मुले, तर १४,४४७ मुली आहेत. चार ट्रान्सजेंडर मुलांचाही समावेश आहे. यातील ३९ टक्के मुलांचे वय ८ ते १३ वर्षे आहे. ही आकडेवारी राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी आयोगाच्या बाल स्वराज पोर्टलवर अपलोड केली होती.

बातम्या आणखी आहेत...