आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शेजारी राष्ट्र पाकिस्तानात कोरोनास्थिती विस्फोटक होत आहे. तेथे सोमवारी कोरोनाचे नवीन ३,७९५ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णांची संख्या ४,२०,२९४ झाली आहे. संसर्ग दर वाढून ९.७१ टक्के झाला आहे. पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. दक्षिण आशियाई देश नेपाळ व बांगलादेशनंतर पाकिस्तानातील दर सर्वाधिक आहे. दक्षिण आशियाई देशांत भारतात सर्वाधिक कमी ३.३% संसर्ग दर आहे.
पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयानुसार, सोमवारी कोविड-१९ मुळे देशात ३७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. पाकिस्तानातील एकूण मृत्यूंची संख्या ८,३९८ झाली आहे, तर एकूण २,५३९ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. पाकिस्तान सरकारनुसार, मागील २४ तासांमध्ये ३९,०७६ चाचण्या झाल्यानंतर कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४,२०,२९४ झाली आहे. देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्यानंतर २५ नोव्हेंबरला ८.५३ टक्के संसर्ग दर नोंदवण्यात आला होता.
स्मार्टफोनद्वारे टेस्टचा ३० मिनिटांत निकाल
कोरोना चाचणीचा निकाल तत्काळ मिळवण्यासाठी जगात प्रयत्न सुरू असताना शास्त्रज्ञांनी सीआरआयएसपीआर आधारित कोरोना तपासणीसाठी नवे तंत्र विकसित केले. यात स्मार्टफोन कॅमेऱ्याचा वापर करत ३० मिनिटांपेक्षा कमी वेळेत अचूक निकाल मिळू शकतो, असा दावा केला जात आहे. सेल या मासिकात प्रकाशित वृत्तानुसार, नवीन तपासणी पद्धतीमुळे केवळ पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नव्हे तर यात व्हायरल लोडचीही तपासणी केली जाते.
न्यूयॉर्कमध्ये प्राथमिक शाळा उघडण्याचा निर्णय
अमेरिकेत कोरोनामुळे स्थिती बिकट होत असताना न्यूयॉर्क शहरात प्राथमिक शाळा उघडण्यात येणार आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, पालक आपल्या मुलांना दीर्घकाळापर्यंत शाळांपासून लांब ठेवू इच्छित नाहीस असे समोर आले आहे. यापूर्वी कोरोनामुळे न्यूयॉर्कमध्ये दोनदा शाळा उघडून बंद करण्यात आल्या होत्या. अमेरिकेतील ७५ सर्वात मोठ्या सार्वजनिक शाळांपैकी १८ शाळांनी रिमोट लर्निंगला सुरुवात केली आहे.
ब्रिटनमध्ये आजपासून लसीकरणास सुरुवात
ब्रिटनमध्ये मंगळवारपासून कोरोना लसीकरण सुरू होईल. फायझरच्या लसीला आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ब्रिटनला ८ लाख डोस मिळाले आहेत. ब्रिटनने कंपनीकडून एकूण ४ कोटी डोस बुक केले आहेत. ब्रिटनमध्ये एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण होईल. दरम्यान ब्रिटनने लसीकरणाच्या अभियानासाठी एकूण ५० ठिकाणे ठरवली आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.