इटलीमध्ये कोरोनाचा हाहाकार; एका दिवसात 793 लोकांचा मृत्यू, परिस्थितीबाबत आरोग्य तज्ज्ञही हैराण

शनिवारी सैनिक ट्रकमधून ताबूत घेऊन इटलीतील बर्गामो शहरात दफन करण्यासाठी नेले. शनिवारी सैनिक ट्रकमधून ताबूत घेऊन इटलीतील बर्गामो शहरात दफन करण्यासाठी नेले.

  • कोरोनामुळे जगभरात 12 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू,  अडीच लाख लोकांना लागण  

दिव्य मराठी वेब टीम

Mar 22,2020 11:34:00 AM IST

रोम - संपूर्ण जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आला. कोरोनामुळे इटलीत एकाच दिवसात 793 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे जगभरातील सर्वाधिक आतापर्यंत 3,095 मृत्यू येथे झाले आहेत.


इटलीच्या नागरी संरक्षण एजन्सीनुसार, शनिवारी येथे 793 लोकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारच्या तुलनेत 20 टक्के अधिक लोकांचा मृत्यू झाला. लोम्बार्डीमध्ये रविवारपर्यंत मृतांचा आकडा 3,095 झाला आहे. इटलीमधील परिस्थिती पाहून आरोग्य तज्ज्ञ हैराण झाले आहेत. त्यांच्यामते, इटलीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय केले. असे असूनही, मृत्यू आणि संसर्ग होण्याचे वाढती प्रकरणे चिंतेचा विषय आहेत.

कोरोनाच्या संक्रमणामुळे जगभरात आतापर्यंत 12 हजारांपेक्षा जास्त लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर अडीच लाख लोकांना या व्हायरसची बाधा झाली आहे. चांगली बातमी म्हणजे चीनमध्ये सतत गेल्या तीन दिवसांपासून घरगुती संक्रमणामुळे कोरोना झाल्याचे एकही प्रकरण समोर आलेले नाही.

X
शनिवारी सैनिक ट्रकमधून ताबूत घेऊन इटलीतील बर्गामो शहरात दफन करण्यासाठी नेले.शनिवारी सैनिक ट्रकमधून ताबूत घेऊन इटलीतील बर्गामो शहरात दफन करण्यासाठी नेले.