आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Corona Outbreak In America | Increased Risk Of Lifting Lockdown, Infection Of 91 People Due To Salon Workers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत संकट:लॉकडाऊन उठवल्याने वाढली जोखीम, सलून वर्करमुळे 91लोकांना संसर्ग

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील मॅरीलँडच्या किनाऱ्याचे हे छायाचित्र. हा किनारा लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. प्रशासनाने न्यूयॉर्कहून येणाऱ्या लोकांना मात्र मनाई केली आहे. - Divya Marathi
अमेरिकेतील मॅरीलँडच्या किनाऱ्याचे हे छायाचित्र. हा किनारा लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. प्रशासनाने न्यूयॉर्कहून येणाऱ्या लोकांना मात्र मनाई केली आहे.
  • अर्थव्यवस्थेला पटरीवर आणण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सवलती
  • वॉशिंग्टन : स्पोकन शहरात पास्ता कारखान्यात 22 जण पॉझिटिव्ह

अमेरिकेत लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची जोखीम वाढली आहे. मिसोरीमध्ये बाधित सलून वर्करमुळे ९१ जणांना बाधा झाली. त्यात ८४ ग्राहक, ७ सहकाऱ्यांचा समावेश आहे. लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर प्रादुर्भाव झालेला कामगार आठ दिवस कामावर आला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.मिसोरीमध्ये ४ मेपासून सलून सुरू झाले होते. कोराेना संसर्गाचे येथे ११ हजार ७५२ रुग्ण असून ६७६ जणांचा त्यात मृत्यू झाला. मिसोरीमध्ये राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीचे नेते माइक पार्सन गव्हर्नर आहेत. ट्रम्प सुरुवातीपासून लॉकडाऊन सुरू करण्याच्या बाजूने होते. वॉशिंग्टनच्या स्पोकन शहरातील एका पास्ता कारखान्यातील २२ कर्मचारीदेखील बाधित आढळून आले. विरोधी डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते जे. इन्सली वॉशिंग्टनचे गव्हर्नर आहेत. लॉकडाऊन लवकर उठवण्याच्या ट्रम्प यांच्यावर मतांवर इन्सली यांनी नेहमीच कडाडून टीका केली आहे. वॉशिंग्टनमध्ये हेअर सलून १ जूननंतर सुरू होऊ शकतात. येथे आतापर्यंत २० हजार ३९५ रुग्ण आले. तर १ हजार ७६ जणांचा मृत्यू झाला. सर्व ५० राज्यांनी वेगवेगळ्या कालावधीत लॉकडाऊन उठवला होता.

एक लाख मृत्यूनंतरही ट्रम्प गोल्फ खेळताहेत : बायडेन

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीमधील डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रबळ दावेदार जो. बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली. बायडेन म्हणाले, कोरोनामुळे सुमारे एक लाख लोकांचा मृत्यू झाला आणि ट्रम्प गोल्फ खेळत आहेत. ट्रम्प यांनी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शनिवारी व्हर्जिनियात गोल्फ खेळला होता. अमेरिकेत ९८ हजार ६८३ जणांचा मृत्यू झाला.

ब्रिटन : लवकरच उद्यान पार्ट्यांची तयारी

लंडन । ब्रिटनमध्ये पुढील महिन्यापासून बाजार, उद्यानातील पार्ट्या, कार विक्री केंद्र, नॅशनल ट्रस्ट पार्क सुरू होऊ शकते. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी यासंबंधीची योजना तयार केली आहे. आता उद्योग व कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाईल, असे जॉन्सन यांनी पत्रकारांना सांगितले. वास्तविक सरकारचे वैज्ञानिक सल्लागारांनी सरकारला दिलासा दिला. ब्रिटनमध्ये कोरोना बाधितांची वृद्धी स्थिर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच सरकार आता लाॅकडाऊन उठवू शकते. ब्रिटनमध्ये आतापर्यंत २ लाख ५७ हजार १५४ रुग्ण आढळले. ३६ हजार ६७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...