आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनमध्ये कोरोना महामारीमुळे सर्वात वाईट परिस्थिती दिसते. त्यामुळे संपूर्ण जगासाठी पुन्हा चिंता निर्माण झाली आहे. रुग्णालयांत मृतदेहांसाठी जागा शिल्लक नाही. चीनसाठी तीन महिने आव्हानात्मक असतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या काळात चीनच्या ६० टक्क्यांहून जास्त नागरिकांना कोरोनाची बाधा झालेली असेल. असे असले तरी सरकारने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे केवळ सुरूच ठेवली नाही तर त्यांची संख्याही वाढवली आहे. झीरो कोविड धोरणात चीनमध्ये दररोज १०० आंतरराष्ट्रीय उड्डाणे होती. ती संख्या आता २ हजारांवर गेली. त्यामुळे इतर देशांच्या चिंतेत भर पडली आहे. चीनमध्ये सध्या ७,२९० देशांतर्गत उड्डाणे सुरू आहेत. हे प्रमाण गेल्या आठवड्याच्या १५८ टक्के जास्त आहे. तीन वर्षांनंतर चीन लॉकडाऊनमधून बाहेर पडला आहे. आता ७ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान २ हजार आंतरराष्ट्रीय व ११, ६६७ देशांतर्गत उड्डाणांची तयारी करत आहे. गेल्या आठवड्यात ३७ लाख लोकांनी हवाई प्रवास केला.
चीनमुळे केंद्र सरकारचा राज्यांना सतर्कतेचा इशारा
चीनमधील वाढत्या संसर्गामुळे भारताची चिंता वाढली. आरोग्य विभागाने राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला. रुग्णांची आेळख, तपास, लसीकरणावर करण्याच्या सूचना दिल्या. पॉझिटिव्ह नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवावेत. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी बैठक घेतली. आफ्रिकेत सर्वात कमी ९,३२१ बाधित, आशियात सर्वाधिक १८.२६ लाख रुग्ण आहेत. युरोप-११ लाख, उत्तर अमेरिका-५.५ लाख, द. अमेरिका-४.७६ लाख, आेसिनिया-१.५ लाख असे बाधित आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.