आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफ्रान्समध्ये वेगाने कोरोना संसर्ग वाढत असल्याचे पाहून राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी देशात चार आठवड्यांचा राष्ट्रीय लॉकडाऊन लागू केला आहे. फ्रान्समधील रुग्णालये जवळजवळ भरली आहेत. आयसीयूमध्ये ५ हजारांहून जास्त रुग्ण आहेत. गुरुवारी गेल्या चोवीस तासांत ४१ हजार नवे बाधित आढळून आले आहेत. नोव्हेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्याची आता पुनरावृत्ती दिसते. सक्रिय रुग्णांची संख्या ४२ लाखांच्या घरात पोहोचली आहे. पॅरिसचे एका प्रमुख रुग्णालयातील आयसीयूचे प्रमुख जीन मिसेल म्हणाले, परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. जणू दुसऱ्या लाटेतील स्थिती वाटतेय. दुसऱ्या लाटेनंतर बेपर्वाई, ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या विषाणूचा प्रकार व लसीकरणात पिछाडीवर पडल्याने स्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे.
तुर्की : सुमारे ४० हजारावर रुग्ण येताहेत आढळून
तुर्कीमध्येही कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. गुरूवारी येथे चोवीस तासांत ३९,३०२ रुग्ण आढळले. तिसरी लाट सुरू आहे. दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त रुग्ण आढळले. देशात २.७१ लाखावर सक्रिय रुग्ण दिसून आले. ३१ हजारांवर मृत्यू झाले आहेत.
अमेरिका : मृत्यूचे तिसरे सर्वात मोठे कारण कोरोना
अमेरिकेत कोरोना मृत्यूचे सर्वात मोठे तिसरे कारण ठरले आहे. गेल्या वर्षी कोरोनासह विविध कारणांनी ३३ लाखांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला. वर्षभरातील हे सर्वाधिक मृत्यू आहेत. त्याशिवाय ह्रदयविकार, कर्करोग यामुळेही जास्त मृत्यू झाले.
ब्राझील: मार्चमध्ये कोरोनाने ६६,५७० मृत्युमुखी
कोरोनामुळे सर्वाधिक फटका ब्राझीलला बसला. मार्चमध्ये एकूण ६६,५७० मृत्यू झाले. फेब्रुवारीतील मृतांपेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे. गुरूवारी येथे सुमारे ९० हजार नवे रुग्ण आढळले. ३९५० मृत्यू झाले. जगात सर्वात जास्त मृत्यू येथे होत आहेत.
डॉक्टरांच्या भावना - ‘फ्रान्समधील स्थिती भयंकर’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.