आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्लक्षाचे परिणाम:जपानमध्ये कोरोनाचा कहर; आणीबाणी लागू झाल्यास ऑलिम्पिक खेळ रद्द; देशभरातील लसीकरणाचा मंद वेग जगासाठी हानिकारक

टोकियो16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोकसंख्या 12 कोटींवर, पण 21 लाख लोकांनाही डोस नाही

जगभरात कोरोनाची दुसरी लाट अतिशय धोकादायक ठरतेय. जपानमध्ये वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहून पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी भारत दौरा रद्द केला आहे. या महिनाअखेरचा नियोजित भारत व फिलीिपाइन्सचाही दौरा रद्द करण्याचा निर्णय सुगा यांनी घेतला. जपानमध्ये वाढणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर सुगा यांनी लक्ष केंद्रित केले आहे. टोकियो, आेसाका व ह्योगो प्रांतातील परिस्थिती बिघडत चालली आहे. जपानमध्ये अतिशय मंद गतीने लसीकरण सुरू आहे.

संसर्ग वाढीमागे हे महत्त्वाचे कारण मानले जाते. ब्लूमबर्ग लस ट्रॅकरनुसार जपानमध्ये केवळ २० लाख ५४ हजार ८८० लोकांना डोस देण्यात आला. देशाची लोकसंख्या मात्र १२ कोटी ६१ लाखांवर आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केवळ १ टक्के लोकांना डोस देण्यात आला. दोन्ही टप्प्यांत मिळून ०.६ टक्के डोस देण्यात आले. संसर्गामुळे २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांच्या आयोजनावर संकट आहे. विविध प्रांतांच्या राज्यपालांनी आणीबाणी लागू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे दबाव वाढला आहे. टोकियोत २९ एप्रिलपासून ९ मेपर्यंत आणीबाणी लागू शकते. येथे आतापर्यंत १३ लाखांहून जास्त बाधित व १,८५० मृत्यू झाले आहेत.

अमेरिका : न्यूयॉर्कनंतर आता व्हॅक्सिन पासपोर्ट हवाईमध्ये ११ मेपासून लागू
अमेरिकी राज्य हवाईत ११ मेपासून व्हॅक्सिन पासपोर्ट लागू केला जाणार आहे. न्यूयॉर्कनंतर हा नियम लागू करणारे हे दुसरे राज्य ठरले आहे. त्यानुसार व्यक्तीला प्रवासादरम्यान कोरोनासंबंधी तपासणीला तोंड देण्याची गरज भासणार नाही. विलगीकरणही होणार नाही. लस घेतल्याची माहिती त्यात नमूद असेल.

जगातील दहा देशांत कोरोनाची चौथी लाट, ब्राझील-तुर्कीची परिस्थिती वाईट
ब्राझील, तुर्की, फ्रान्स, अर्जेंटिना, इराण, कोलंबिया, जर्मनी, इटली, पेरू, पोलंडसारख्या देशांत दर दिवशी १० हजारांहून जास्त लोक बाधित होत आहेत. या देशांत कोरोनाची चौथी लाटही सुरू आहे. संसर्ग अनियंत्रित झाल्याने ब्राझील व तुर्कीची स्थिती वाईट बनली आहे.

छायाचित्र क्रिस्टी अँडर्सनसह एक वर्षाच्या थियो स्टोबचे आहे. प्रसूतीच्या मुदतपूर्व जन्मल्याने त्याचे वजन कमी होते. तो कोरोनाने बाधित होता. जन्मानंतर त्याची ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी तीन वेळा ब्लड ट्रान्सफ्यूजन झाले. आईला स्टेरॉइड्सचे इंजेक्शन दिले गेले. आता एक वर्षानंतर दोघांनी कोरोनाला पराभूत केले आहे.

ब्रिटन : बोरिस जॉन्सन यांचा दावा- सप्टेंबरपर्यंत बचावासाठी गोळी
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले, सप्टेंबर-डिसेंबरच्या मध्यावर कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोळी आणली जाईल. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासणार नाही. अँटिव्हायरल टास्कफोर्सची स्थापनेद्वारे गोळीची निर्मिती होईल.

बातम्या आणखी आहेत...