आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर अमेरिकेतील देश:कॅनडा : केअर होम्समध्ये 6500 मृत्यू, पीएम म्हणाले - मी निराश झालो

टोरंटोएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
छायाचित्र आँटेरियो राज्याचे आहे. केअर होम्समध्ये स्वच्छता केली जात आहे. - Divya Marathi
छायाचित्र आँटेरियो राज्याचे आहे. केअर होम्समध्ये स्वच्छता केली जात आहे.
  • अमेरिकेनंतर कॅनडा व मेक्सिकोची स्थिती होतेय वाईट

कॅनडात कोरोनामुळे ८० टक्के म्हणजे ६५०० मृत्यू केअर होम्समध्ये झाले आहेत. आँटेरियो सरकारने आपल्या अहवालात हा दावा केला आहे. आँटेरियाचे मुख्य डग फोर्ड यांनी हा अहवाल दिला आहे. यात म्हटले आहे की, ज्या केअर होम्समध्ये हे मृत्यू झाले तेथे अस्वच्छता होती. ज्येष्ठांना अनेक आठवडे अंघोळ करता आली नव्हती. जेवायला मिळत नव्हते. अंथरूण घाण होते. ज्येष्ठ जीव वाचवण्यासाठी विनंती करायचे, मात्र त्यांची कोणीच मदत केली नाही. सर्वात वाईट स्थिती आँटेरियो आणि क्युबेक राज्यांतील केअर होम्सची आहे. येथे लष्कर तैनात केले आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनी स्थिती बघून त्रस्त झाल्याचे म्हटले आहे. कॅनडात आतापर्यंत ८६६४७ रुग्ण आढळले आहेत, तर आँटेरियो प्रशासनाच्या अहवालानुसार ८१२५ मृत्यू झाले आहेत.

अमेरिका: ६२३४४ आरोग्य कर्मचारी बाधित, २९१ मृत्यू

अमेरिकेतील सर्वोच्च आरोग्य संस्था सीडीसीने म्हटले आहे की, देशात आतापर्यंत ६२३४४ आरोग्य कर्मचारी बाधित झाले आहेत, तर २९१ मृत्यू झाले आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, आकडेवारी जास्त असू शकते कारण नोकरी सोडून गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची यात माहिती नाही. अमेरिकेत आतापर्यंत १७२७९९२ रुग्ण आढळले आहेत, तर १००६२९ मृत्यू झाले आहेत.

ब्राझील : ३ दिवसांत सर्वाधिक मृत्यू, २४ तासांत १०२७ मृत्यू

ब्राझीलमध्ये तीन दिवसांत जगात सर्वाधिक मृत्यू येथे झाले आहेत. येथे २४ तासांत १०१७ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत ३९४५०७ रुग्ण आढळले तर २४५९३ मृत्यू झाले आहेत. डब्ल्यूएचओच्या अमेरिकेच्या विभागाच्या संचालक केरिसा इटिन यांनी सांगितले की, ही वेळ लॉकडाऊनमध्ये सूट देण्याची नाही. ऑगस्टपर्यंत ब्राझीलमध्ये स्थिती आणखी बिघडू शकते. मेक्सिको : पहिल्यांदाच एक दिवसात ५०० पेक्षा जास्त मृत्यू; आरोग्य अधिकाऱ्यांना चांगले पीपीई किट हवे

मेक्सिको सिटी |

मेक्सिकोमध्ये पहिल्यांदाच कोरोनामुळे एका दिवसात झालेल्या मृतांचा आकडा ५०० च्या पुढे गेला. ५०१ जणांचा मृत्यू झाला. उत्तर अमेरिकी देशांपैकी अमेरिका आणि कॅनडानंतर मेक्सिको सर्वाधिक बाधित आहे. एका दिवसात सर्वाधिक ३४५५ जण बाधित झाले. देशात आतापर्यंत ७४५६० रुग्ण आढळले आहेत आणि ८१३४ मृत्यू झाले आहेत. दरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगल्या पीपीई किटच्या मागणीसाठी राजधानी मेक्सिको सिटीत रास्ता रोको केला. मेक्सिकोची लोकसंख्या १२.५ कोटी आहे. येथे आतापर्यंत २३०००० तपासण्या झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...