आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • International
 • Corona Outbreak In World: Corona Caused The Second, Third Wave In Half The Countries Of The World; News And Live Updates

दहा देशांत पुन्हा उद्रेक:कोरोनामुळे जगातील निम्म्या देशांत दुसरी, तिसरी लाट; एकूण बाधित 13 कोटीपार, 65 देशांत नवे रुग्ण

नवी दिल्ली / न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • तीन महिन्यांत सर्वाधिक बाधित अमेरिका, ब्रिटनसह 35 देशांत संसर्गाचा विक्रम
 • ब्राझील, युक्रेन, तुर्की, पेरू, बांगलादेश, हंगेरी, इराकच्या नावे विक्रम

जगभरात भलेही काेराेनापासून बचावासाठी लसीकरण सुरू आहे, परंतु विषाणू संसर्ग काही कमी हाेताना दिसत नाही. काेराेना काळाच्या सव्वा वर्षानंतरही निम्म्याहून जास्त देशांत संसर्गाची दुसरी किंवा तिसरी लाट दिसतेय. काेराेनाचे आफ्रिका व ब्रिटनमधील विषाणूचे स्वरूप जास्त घातक दिसते. म्हणूनच गेल्या पंधरा दिवसांत रुग्णांची दैनंदिन संख्या सरासरी ७ लाखांहून जास्त आहे. आतापर्यंत १३ काेटींहून जास्त लाेक बाधित झाले आहेत. सर्वाधिक ३५ पैकी १० देशांत दैनंदिन रुग्णसंख्या आणखी वाढली आहे. २८.५१ लाखांहून जास्त लाेकांचे प्राण गेले आहेत. गेल्या एक महिन्यात ब्राझीलसह अनेक देशांत रुग्णसंख्या वाढली. या यादीत युक्रेन, पाेलंड, बांगलादेश, तुर्की, फिलिपाइन्स, पेरू, हंगेरीचाही समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांतील एकूण रुग्णसंख्येचा विचार केल्यास २० देशांनी दरराेजच्या रुग्णसंख्येचा विक्रम नाेंदवला. जगातील ६५ देशांत नव्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंताही वाढली आहे.

या लाटेत फिलिपाइन्समध्ये पीक अडीचपट, तुर्कीत २५ % जास्त
देश पहिला पीक (महिना) आता

ब्राझील 70869 (जुलै) 97586
युक्रेन 16294 (नोव्हेंबर) 19893
तुर्की 33198 (डिसेंबर ) 42308
बांगलादेश 4014 (जुलै) 6830
फिलिपाइन्स 6871 (अॉगस्ट) 15280
पेरू 10143 (अॉगस्ट) 12916
हंगेरी 6819 (नोव्हेंबर ) 11265
इराक 5055 (सप्टेंबर) 6664
कॅमरून 2324 (जुलै) 9668

हे देश नव्या पीकच्या दिशेने
इराण 14051 (नोव्हेंबर) 11750
पोलंड 37596 (नोव्हेंबर) 35246
पाकिस्तान 6825 (जुलै) 5234
अर्जेंटिना 18326 (अॉक्टोबर) 16056

नियम : इटली, आॅस्ट्रियासह ७ देशांत ईस्टरला लाॅकडाऊन
ईस्टर संडे
हा ख्रिश्चन समुदायासाठी महत्त्वाचा सण आहे. परंतु गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही काेराेना विषाणूची बाधा जास्त असल्यामुळे इटली, आॅस्ट्रियासह सात देशांत ईस्टरला लाॅकडाऊन राहणार आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद राहील. लाेकांना काेठेही भटकंती करता येणार नाही.

 • जर्मनीत १४ दिवसांच्या कडक लाॅकडाऊनची तयारी सुरू झाली. जर्मनीचे आराेग्यमंत्री जेन्स स्पॅन म्हणाले, महामारी नियंत्रणासाठी देशात १० ते १४ दिवसांचा लाॅकडाऊन गरजेचा आहे.
 • ब्राझीलच्या सावाे-पावलाे व रिअो दि जानेरिअो शहरांत साेमवारपासून शाळा सुरू हाेतील. ९ एप्रिलपर्यंत बार, रेस्तराँवर बंदी आहे. त्यामुळे नागरिकांत नाराजीही आहे.
 • कॅनडातील आेंटारियोमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू झाला. संपूर्ण एप्रिल महिना हा लॉकडाऊन असेल. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
 • फिलिपाइन्सने रुग्ण वाढल्याचे पाहून मनिलासह अनेक शहरांत कडक लाॅकडाऊन लागू करण्याचे जाहीर केले. या िनर्णयामुळे २.४ काेटी लाेकसंख्येला घरातच राहावे लागेल.
 • अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस बाधित झाले आहेत. जानेवारीत त्यांनी कोराेनापासून बचावासाठी लस घेतली होती.

अमेरिका : आढळले ११ हजार ५०० रुग्ण
अमेरिकेत काेराेनाचा सर्वात घातक प्रकाराची बाधा झाल्याचे ५०० रुग्ण आढळून आले. त्यामुळे सुपर स्प्रेड म्हणजेच वेगाने संसर्ग हाेणे. हे संकट लक्षात घेऊन जगभरात लसीकरण कार्यक्रम पूर्ण करणे जास्त गरजेचे आहे. अन्यथा हा प्रकार पुन्हा ताेंड वर काढेल. त्यानंतर लसीकरणाचा प्रभाव कमी हाेईल.

ब्रिटन: लसीनंतर रक्त गोठले, ७ मृत्युमुखी
ब्रिटनमध्ये मेडिसिन अँड हेल्थकेयर रेग्युलेटरी संस्थेने रक्त गोठल्याने ७ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. हे दुर्मिळ आहे. इतर मृत्यूचे कारण समजू शकले नाही. एस्ट्राजेनेका लसीमुळे संसर्ग रोखता येतो. हा लाभ लसीच्या इतर गुंतागुंतीच्या तुलनेत खूप मोठा आहे, असे एमएचआरने म्हटले होते.

पाकिस्तानमध्ये काेराेनाची तिसरी लाट
पाकिस्तानचे मुख्य विराेधी पक्ष पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुत्ताे-झरदारी म्हणाले, काेराेेनाच्या तिसऱ्या लाटेला ताेंड देण्याची क्षमता पाकिस्तानात नाही. पाकिस्तानात २४ तासांत ५२३४ नवे रुग्ण आढळून आले. गेल्या पिक (६८२५) जवळ ही संख्या जात आहे. पाकिस्तानातील लसीकरण्याची प्रक्रिया मंद आहे.

बातम्या आणखी आहेत...