आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Corona Outbreak In World : Europe Now Forgets The Mask quarantine, Two Million Patients A Day; The Second Wave Of Infection In European Countries, Broke The Record

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनियंत्रित विषाणू:युरोपला आता मास्क-क्वॉरंटाइनचा विसर, दिवसभरात दोन लाख रुग्ण; युरोपीय देशांमध्ये संसर्गाची दुसरी लाट, विक्रम मोडला

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
इटलीच्या मिलान शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
  • आता पश्चात्ताप... बेल्जियममध्ये पुन्हा रेस्तराँ बंद

युरोप खंडात कोराेनाची दुसरी लाट दिसू लागली आहे. येथे पहिल्यांदाच एका दिवसात सर्वाधिक २ लाख १७ हजार ३७० रुग्ण आढळून आले आहेत. आधी १२ ऑक्टोबरला एका दिवसात सर्वाधिक एक लाख रुग्ण आढळून आले होते. दहा दिवसांत दैनंदिन रुग्णांतील दुपटीचे अंतर चिंता वाढवणारे असल्याचे तज्ज्ञांना वाटते. संसर्ग रोखण्याच्या बाबतीत युरोप आणि उत्तर अमेरिकेने आशियाकडून काहीतरी शिकले पाहिजे, असा सल्ला एका तज्ज्ञाने दिला आहे.

आशियातील देशांनी कोरोना रोखण्यासाठी चांगली उपाययोजना केली आहे. विशेष म्हणजे बाधितांच्या संपर्कात आल्यानंतर लोक स्वत:ला क्वॉरंटाइन करू लागले आहेत. ही बाब शिकण्यासारखी आहे. बहुतांश लोक मास्कसारखे कोरोना प्रोटोकॉलचेदेखील पालन करत आहेत. युरोप व उत्तर अमेरिकेमध्ये मात्र असे दिसत नाही. म्हणूनच या खंडातील चिंता वाढली आहे. कारण युरोपात ४ एप्रिलमध्ये कोरोनाची सर्वोच्च स्थिती निघून गेली होती. तेव्हा एका दिवसात येथे ३८ हजार रुग्ण आढळून येत होते. युरोपच्या बहुतांश देशांत जून-जुलैपासून परिस्थिती सामान्य होत होती. मात्र लोकांनी अनलॉक झाल्यानंतर विनामास्कच्या पार्ट्या केल्या. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला. आता प्रति व्यक्ती संसर्गाबाबत युरोप पहिल्यांदाच अमेरिकेच्याही पुढे गेला आहे. युरोपात ७८ लाख ३१ हजार २१ रुग्ण आढळून आले, तर २ लाख ४६ हजार २८० मृत्यू झाले.

आता पश्चात्ताप... बेल्जियममध्ये पुन्हा रेस्तराँ बंद

> बेल्जियम : सर्व बार-रेस्तराँ चार आठवड्यांसाठी बंद करण्याचे आदेश आहेत.

> इटली : मास्क अनिवार्य केला. लॉकडाऊन नको असल्यास पालन करा : सरकार

> फ्रान्स : पॅरिससह नऊ प्रमुख शहरांत चार आठवड्यांसाठी रात्रीची संचारबंदी.

> जर्मनी: रेस्तराँ-बार रात्री बंद. हायरिस्क देशांतून येणाऱ्यांची तपासणी अनिवार्य केली.

> वेल्स : दोन आठवड्यांच्या नॅशनल लॉकडाऊनची घोषणा.

> स्वित्झर्लंड : मास्क अनिवार्य केला. १५ हून जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई.

> स्पेन : राजधानी माद्रिद व परिसरात १५ दिवसांची आणीबाणी जाहीर.

> नेदरलँड : बार-रेस्तराँ बंद करण्याचे आदेश. घरातच राहण्याचा सल्ला.

> ग्रीस : सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केला.

> पोर्तुगाल : पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई. विवाहासाठी ५० लोकांची मर्यादा. त्यामुळे लोकांना आता नियम पालन करावे लागत आहे.

रशिया, स्पेनमुळे चिंतेत भर

रशिया, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन, इटली युरोपातील सर्वाधिक बाधित देश आहेत. रशियात आठवडाभरात किमान १५ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. ऑगस्टमध्ये येथे ५ हजारांवर नवे रुग्ण आढळून येत असत. स्पेनमध्ये गुरुवारी सर्वाधिक २० हजार ९८६ रुग्ण आढळले. जूनमध्ये येथे दैनंदिन २०० रुग्ण आढळून येत होते. फ्रान्समध्ये गुरुवारी सर्वाधिक ४१ हजार ६२२ रुग्ण होते. जूनमध्ये दररोज ५०० रुग्ण होते.