आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जगात कोरोना:अमेरिकेत लाेकांना मास्क नकोत, 18 राज्ये ‘रेड झाेन’; चाेवीस तासांत 75 हजार 600 रुग्ण, भारत-ब्राझीलहून जास्त

वाॅशिंग्टन16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र टेक्सास प्रांतातील सॅन अँटोनियो शहरातील आहे. कोरोना संकटामुळे लोकांना खाद्य पाकिटांसाठी फूड बँकसमोर रांगा लावाव्या लागत आहेत.
  • इराणमध्ये सध्या अडीच कोटी रुग्ण, पुढे साडेतीन कोटींवर जातील : राष्ट्रपती रुहानी
Advertisement
Advertisement

अमेरिकेत काेराेनावरील िनयंत्रण कठीण हाेत चालले आहे. येथे गेल्या एका महिन्यात दरराेज आढळणाऱ्या रुग्णसंख्येचा विक्रम माेडीत निघाला आहे. येथे २४ तासांत ७५ हजार ६०० रुग्ण आढळून आले. सर्वाधिक कोरोनापीडित ब्राझील व भारतातील एकूण रुग्णसंख्येहून हे प्रमाण जास्त आहे. ब्राझीलमध्ये चोवीस तासांत ३३ हजार ३५९ व भारतात ३४ हजार ८२० रुग्ण आढळले. परिस्थिती बिघडल्यामुळे आरोग्य विभागाने कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, टेक्साससह १८ राज्यांत रेड झोन घोषित केला. एक लाख लोकसंख्येमागे १०० नवे रुग्ण अशा सरासरीनुसार अमेरिकेत रेड झोन मानला जातो. सूत्रांच्या मते व्हाइट हाऊसने गेल्या आठवड्यात एक अहवाल तयार केला होता. हा अहवाल मात्र जाहीर झाला नव्हता. त्यात प्रशासनाचे वाभाडे निघाले आहेत. त्यानुसार अनेक राज्यांत लॉकडाऊनचे नीटपणे पालन झाले नाही. लोक घरात राहणे पसंत करत नाहीत. ते मास्कदेखील लावत नाहीत. त्यामुळे कोरोना वेगाने फैलावत आहे. या राज्यांतील लोकांनी कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे, असे अहवालात नमूद केले आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३७ लाख ७१ हजार १०१ रुग्ण आढळून आले आहेत, तर १ लाख ४२ हजार ८० जणांचा मृत्यू झाला. कोरोनापासून संरक्षणासाठी लोकांना मास्क लावण्याचे आदेश दिले जाणार नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. देशातील आघाडीचे संसर्ग रोगतज्ञ डॉ. अँथनी फॉसी यांनी स्थानिक नेत्यांना लोकांना मास्क लावण्यासाठी प्रेरित करावे, असे फॉसी यांनी आवाहन केले. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे वक्तव्य जारी झाले.

ऑस्ट्रेलिया : हाॅटस्पॉट झालेल्या व्हिक्टोरियात रुग्णसंख्येत घट

मेलबर्न । ऑस्ट्रेलियात हॉटस्पॉट झालेल्या व्हिक्टोरियात नवीन रुग्णसंख्येत अचानक घट झाली. शनिवारी येथे २१७ रुग्ण आढळले. गेल्या पाच दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे. शुक्रवारी ४२८ रुग्ण आढळले होते.

नवीन आकड्यांमुळे काहीसा दिलासा मिळाला, परंतु मेलबर्नमध्ये लॉकडाऊन सुरूच राहणार आहे. ६ आठवड्यांपासून तो सुरू आहे. ऑस्ट्रेलियात कोरोनाचे ११ हजार ४४१ रुग्ण आढळून आले, तर ११८ जणांचा मृत्यू झाला.

सध्या अडीच कोटी रुग्ण, पुढे साडेतीन कोटींवर जातील : रुहानी

तेहरान । इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी म्हणाले, देशात सुमारे अडीच कोटी लोक कोरोनाबाधित आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या नव्या अध्ययनानुसार हा दावा करण्यात आला आहे. लोकांनी महामारीचा धोका नीटपणे लक्षात घेतला पाहिजे, अन्यथा इराणमध्ये बाधितांची संख्या ३.५ कोटींवर जाऊ शकते. गेल्या १५० दिवसांतील परिस्थिती अशाच प्रकारचे संकेत देत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार इराणमध्ये २ लाख ७१ हजार ६०६ रुग्ण आढळून आले, तर १३ हजार ९७९ जणांचा मृत्यू झाला.

Advertisement
0