आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा ९.९३ कोटीवर गेला आहे. जगभरात या विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत नाही. न्यूझीलंडने संसर्ग रोखण्यासाठी चांगले प्रयत्न केले. त्याचे जगभरातून कौतुकही झाले. मात्र आता दोन महिन्यांनंतर न्यूझीलंडमध्ये समूह संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. आरोग्य संचालक अॅश्ले ब्लूमफील्ड रविवारी म्हणाले, ५६ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे उजेडात आले आहे. ही महिला अलीकडेच युरोपातून परतली आहे. त्या महिलेने १४ दिवसांच्या क्वॉरंटाइननंतर दोन वेळा तपासणी केली. त्यात त्या निगेटिव्ह आढळून आल्या. १३ जानेवारीला त्या घरी परतल्या. तेव्हा काही दिवसांतच त्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागली. पुन्हा तपासणी केली. तेव्हा त्या पॉझिटिव्ह आढळून आल्या. या महिलेसोबत अन्य एखादी महिला प्रवासी होती का? तिला काही लक्षणे आढळून येत आहेत का? हेही शोधले जात आहे. ब्रिटननमध्ये कोरोना संसर्गाला रोखण्यात अद्याप यश आलेले नाही. त्यामुळेच देशात १७ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. धोका असलेल्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना १० दिवसांसाठी क्वारंटाइन करण्याचीही ब्रिटनने सक्ती केली आहे.
बरे झालेले रुग्ण नव्या विषाणूच्या काळात ६ महिने सुरक्षित
न्यूयॉर्क | एका नव्या अभ्यासानुसार कोरोना महामारीतून बरे झालेले लोक नव्या विषाणूपासून सहा महिने सुरक्षित राहू शकतात. संसर्ग झाल्यानंतर व्यक्तीमध्ये दीर्घकाळ रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. या अँटिबॉडी दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेनसारख्या गोष्टींचाही सामना करू शकतात. अमेरिकेतील रॉकफेलर विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनाची माहिती ‘नेचर’ मध्ये प्रकाशित झाली आहे. रोगप्रतिकारक पेशी अँटिबॉडीज तयार करतात. पुढेही अँटिबॉडी तयार होतात. रोगप्रतिकारशक्ती प्रणालीला विषाणूचे स्मरण असते, या मांडणीला सिद्ध करणारे हे आतापर्यंतचे सर्वात ठोस संशोधन मानले जाते.
जगभरात आतापर्यंत संख्या ९.९४ कोटींच्या घरात, ७ कोटी झाले बरे
- जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ९.९४ कोटीच्या घरात गेली. सोमवारी हा आकडा १० कोटीवर जाऊ शकतो. त्यापैकी ७ कोटी रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत.
- आशियायी देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळतेय. युरोप, अमेरिकेत मात्र कहर आहे. सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या पाच देशांत अमेरिकेशिवाय चार देश युरोपचे आहेत.
- एक लाख लोकांत मृत्यूचे जास्त प्रमाण ब्रिटनमध्ये आहे. त्यानंतर झेक रिपब्लिक, इटली, अमेरिका, स्पेनचा क्रमांक लागतो. जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत ब्रिटनमध्ये ९६,१६६ मृत्यू झाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.