आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेराेनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा वेग वाढल्याचे आढळून येते. त्यामुळेच जगभरात दरराेज किमान १५ लाखांहून जास्त बाधित आढळत आहेत. ओमायक्रॉनचा कहर साेसणाऱ्या आॅस्ट्रेलियात राेज सुमारे ३० हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यानंतरही आॅस्ट्रेलियात बाधितांच्या संपर्कात आलेल्यांविषयी नरमाईची भूमिका घेतली आहे. सरकारने कमीत कमी लाेकांचे विलगीकरण केले आहे. नव्या नियमानुसार एकाच घरात राहणाऱ्या किंवा एकाच कार्यालयात काम करणारे बाधितासाेबत चार तास राहिले तरच त्यांना संपर्कात आलेली व्यक्ती (क्लाेज काँटॅक्ट) मानले जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. हे नियम १ जानेवारीपासून लागू झाले आहेत. त्यावरून वादालाही सुरूवात झाली आहे.
लक्षण नसलेल्यांना ५ दिवसांचा मास्क अनिवार्य
काेराेनाची लक्षणे नसलेल्यांना बाधितांना पीसीआर किंवा रॅपिड अँटिजनच्या निगेटिव्ह अहवालाची गरज नाही. त्यासाठी पाच दिवसांच्या विलगीकरणानंतर त्यांना पाच दिवस मास्क अनिवार्य असेल. आराेग्य यंत्रणांच्या या निर्णयामुळे संशाेधकांची चिंता वाढवली आहे. या निर्णयामुळे काेराेनाचा संसर्ग वेगाने वाढण्याचा इशारा संशाेधकांनी दिला. त्याचबराेबर त्यातून रुग्णालयांवरदेखील बाेजा वाढेल, असे संशाेधकांनी म्हटले आहे.
ओमायक्रॉनमुळे व्यवस्था काेलमडली, अहवालात विलंब
जुन्या नियमांमुळे माेठ्या संख्येने डाॅक्टर, नर्स व तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील आराेग्य व्यवस्था काेलमडली. आेमायक्राॅनच्या वाढत्या संसर्गामुळे तपासणी केंद्रांवर तपासणीसाठी लाेकांच्या रांगा दिसू लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात १८ लाखांहून जास्त लाेकांनी तपासणी केली. एवढ्या माेठ्या संख्येने झालेल्या तपासणीच्या पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक कर्मचारी वर्गदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे अहवाल मिळण्यास आठवड्याचा विलंब हाेत आहे. आराेग्य कर्मचाऱ्यांचा सरकारच्या नियमाला िवराेध आहे. आॅस्ट्रेलियन मेडिकल असाेसिएशनचे अध्यक्ष आेमर खुर्शिद म्हणाले, सरकारच्या निर्णयामुळे काेविड-१९ चा संसर्ग वाढू शकताे. दुर्लक्षामुळे इतरही बाधित हाेतील.
जग : अमेरिकेसह चार देशांत एक लाखाहून जास्त रुग्ण
अमेरिकेत बाधित सलग तिसऱ्या दिवशी ४.४० लाखावर.
फ्रान्समध्ये एका दिवसात एकूण २.३ लाख नवे रुग्ण.
ब्रिटन : सलग दुसऱ्या दिवशी १.८९ लाख बाधित
इटली : नवे रुग्ण १.४ लाखावर आढळले. तुलनेत २० टक्के वाढ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.