आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:ब्रिटनमध्ये कोरोनाकाळात मद्यपान, सिगारेटच्या व्यसनांमध्ये 40 % वाढ; तरुण वर्ग जाळ्यात!

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जग आणखी काेराेना व लाॅकडाऊनच्या समस्येतून बाहेर पडलेही नाही ताेच आणखी एका लाटेमुळे समस्येत भर पडली आहे. परंतु जगभरातील माेठ्या समुदायाचे लसीकरण झाले आहे. तेवढा एक दिलासा. काेराेनाच्या काळातच सिगारेट व मद्यपानाच्या व्यसनात आणखी वाढ झाल्याचेही दिसून आले आहे. त्यातही युराेपीय देशांतील नशापानाने सर्वांची चिंता वाढवली आहे. नशापानाच्या जाळ्यात तरुण अडकले आहेत. ‘अॅडिक्शन’ नियतकालिकातून याबाबतचा धक्कादायक अहवाल जाहीर झाला आहे.

महामारीच्या आधीच्या तुलनेत काेराेना काळात ब्रिटनमध्ये ४५ लाख वयस्करांनी मद्यपान करण्यास सुरुवात केली. एकूणचे हे मद्यपानाचे ४० टक्के वाढलेले प्रमाण असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. ही प्रवृत्ती महिलांसह अल्पवयातील वर्गातदेखील दिसून आली आहे. पहिल्या लाॅकडाऊनच्या काळात ६ लाख ५२ हजार तरुणांना धूम्रपानाचे व्यसन जडले हाेते. आॅक्टाेबर २०२१ मध्ये युराेपीय जर्नल आॅफ पब्लिक हेल्थमध्ये एक लेख प्रकाशित झाला. फ्रान्समध्ये पहिल्यांदा लाॅकडाऊन मार्च २०२० मध्ये लागू झाला. धूम्रपान करणाऱ्यांपैकी २७ टक्के लाेक म्हणाले, आमचे तंबाखूजन्य पदार्थ सेवन वाढले. १९ टक्के लाेकांनी सेवन कमी झाले. व्यसन वाढलेल्यांचा वयाेगट १८ ते ३४ असा हाेता. मद्यपान करणाऱ्यांपैकी ११ टक्के लाेकांनी लाॅकडाऊनच्या काळात मद्यपान वाढल्याचे मान्य केले. २४.४ टक्केंनी मद्यपान करणे कमी केल्याचे सांगितले.

१३० काेटी लाेकांद्वारे तंबाखू उत्पादनांचा वापर
जागतिक आराेग्य संघटनेनुसार मद्यपानामुळे ३० लाखांवर लाेकांना प्राण गमवावे लागतात. जगभरात विविध आजारांवरील उपचारासाठी येणाऱ्या खर्चापैकी ५.१ टक्के खर्च हा केवळ मद्यपानाशी संबंधित आजारांवर केला जात आहे. तंबाखूजन्य पदार्थांमुळे दरवर्षी ८० लाखांवर लाेकांना प्राण गमावावे लागतात. मृतांत सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करणाऱ्या सुमारे १२ लाख लाेकांचा समावेश आहे. कारण ते धूम्रपान करणाऱ्यांच्या संपर्कात येतात. त्यातून त्यांना प्राण गमवावे लागतात. एका अंदाजानुसार जगभरात १३० काेटी लाेक सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात.

बातम्या आणखी आहेत...