आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Corona Produces Different Antibodies In Children And Adults, According To Research In The United States

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटिबॉडी:कोरोनामुळे मुले व मोठ्यांमध्ये वेगवेगळ्या अँटिबॉडी होतात तयार, अमेरिकेमधील संशोधनाचा दावा

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलांच्या शरीरात जास्त पसरत नाही विषाणू

कोरोना संसर्गामुळे मुले आणि मोठ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अँटिबॉडी तयार होतात. तसेच अँटिबॉडीचे प्रमाणही त्यांच्या वेगवेगळेे असते. ही माहिती अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या एका अभ्यासात दिसून आली आहे. संशोधनात म्हटले आहे की, अँटिबॉडीचे प्रमाण आणि प्रकारातील फरकातून दिसते की, कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्याविरोधात इम्यून सिस्टिमची प्रतिक्रिया मुले व मोठ्यांमध्ये वेगवेगळी असते. बहुतांश मुलांची कोरोनातून सहज सुटका होते. हे संशोधन नेचर इम्युनोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. संशोधक डोना फार्बर यांनी सांगितले, या संशोधनात मुलांमध्ये तयार होणाऱ्या अँटिबॉडीचे सखोल विश्लेषण करण्यात आले. मुलांमध्ये संसर्गाचा कालावधी खूप कमी असतो आणि खूप जास्त फैलावही होत नाही. मोठ्यांच्या तुलनेत मुले विषाणूला जास्त प्रभावी पद्धतीने नष्ट करतात आणि त्यांना खूप जास्त अँटिबॉडी इम्यून रिस्पॉन्सचीही गरज भासत नाही.या संशोधनात ४७ मुलांचा समावेश करण्यात आला होता. यातील सोळांवर मल्टी सिस्टिम इन्फ्लामेट्री सिंड्रोम किंवा एमआयएस-सीचा उपचारही झाला होता, तर ३१ मुले सामान्य कोरोना पॉझिटिव्ह होते. सर्व मुलांमध्ये कोरोनाविरोधात एकसारखा इम्यून प्रोफाइल तयार झाला. हा प्रोफाइल मोठ्यांच्या इम्यून प्रोफाइलपेक्षा पूर्णपणे वेगळा होता.

दरम्यान, कोरोना संसर्ग वाढत असताना सुरूवातीच्या लाटेत मुलांवर काहीही परिणाम होत नसल्याचे संशोधन अनेक अभ्यास प्रकल्पातून सांगण्यात आले होते. मात्र युराेपातील काही देशांत मुलांवरील परिणाम दिसून आले होते. परंतु हे प्रमाण अत्यल्प होते. नव्या संशोधनात मात्र मुलांवरील परिणामांचा व्यापक अभ्यास झाला आहे. विषाणूचा विविध आजाराने पीडित असलेल्या व्यक्तींचा देखील अनेक ठिकाणी अभ्यास सुरू आहे. अजूनही विषाणूचा सखोल अभ्यास केला जात आहे.

मुलांमध्ये स्पाइक प्रोटीनच्या विरोधात कमी अँटिबॉडी
मुलांमध्ये मोठ्यांच्या तुलनेत विषाणूच्या स्पाइक प्रोटीनसाठी कमी अँटिबाॅडी तयार झाल्या. याच प्रोटीनच्या मदतीने विषाणू मानवाच्या पेशींना संसर्ग करतो. संशोधकांचे म्हणणे आहे की, विषाणू जेवढा मोठ्यांच्या शरीरात पसरतो तेवढा मुलांच्या शरीरात पसरत नाही हे यातून दिसते. यामुळेच मुलांमध्ये कमी अँटिबाॅडी तयार होतात. स्पाइक प्रोटीनविराेधात अँटिबॉडीचे प्रमाण गंभीर आजारी रुग्णांमध्ये जास्त असते.