आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना व्हायरसमुळे अनेक लोक यावेळी उन्हाळ्यात स्विमिंग करू शकले नाही. तज्ञांच्या मते, कोरोना होण्याची शक्यता बाहेर नाही तर घरात जास्त आहे. परंतु ही शक्यता शून्य नाहीत. याशिवाय जे लोक स्विमिंग पूल आणि वॉटर पार्कमध्ये आनंद घेऊ इच्छितता त्यांच्यासाठी देखील मार्गदर्शक सूचना इतर कामांप्रमाणे आहे. जसे की, मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि वारंवार हात स्वच्छ धुणे.
पाणी हा मुख्य धोका नाही
गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मिसुरीच्या ओझरक्स तलावाच्या पूल पार्टीला गेलेला एक व्यक्ती कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. तज्ञ म्हणतात की पाणी हा धोका नाही.
पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीच्या पर्लमन स्कूल ऑफ मेडिसिनमधील संसर्गजन्य आजारांचे प्रमुख अब लॉटेनबॅश सांगतात की, समुद्राचे पाणी आणि विशेषतः स्विमिंग पुलच्या पाण्यात धोकादायक असे काहीही नाही. हा आजार पाण्याद्वारे पसरत नाही. स्विमिंग पुलाच्या पाण्यातील क्लोरीन आणि ब्रोमान व्हायरसला निष्क्रिय करतात आणि पाण्यात याची लागण होण्याची शक्यता कमी होते.
कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ऑफ मेलमॅन ऑफ पब्लिक हेल्थमधील व्हायरलॉजिस्ट अँजेला रासमसन सांगतात की, "स्विमिंग पुलाच्या पाण्यातून संसर्ग होण्याची सैद्धांतिक शक्यता आहे. परंतु ते इतके कमी आहे की त्याचा परिणाम शून्य होईल." पुलच्या पाण्याद्वारे होणाऱ्या संसर्गाचा धोका तिथे येणार्या लोकांकडून जास्त असतो.
पाण्यापेक्षा तुमच्या जवळ कोण उभा आहे याची चिंता करा
या क्षणी तज्ञांमध्ये एकमत आहे की कोरोनाव्हायरसचा प्रसार करण्याचा सर्वात प्राथमिक मार्ग मनुष्याद्वारे आहे. याशिवाय एखाद्या व्हायरसयुक्त पृष्ठभागाला स्पर्श केल्यास संसर्गाचा धोका होऊ शकतो. परंतु रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या मते, पाणी विषाणूचा प्रसार करण्याचे मुख्य माध्यम नाही.
यामुळे पाणी आणि लाउंज चेअरचा पृष्ठभागाबाबत चिंता करू नये. याशिवाय वॉटर पार्कमध्ये तुमच्या जवळ असलेल्या व्यक्तींपासून सावध राहा. तुम्हाला लॉकर रूम आणि कॅफे यांसारख्या इंडोर ठिकाणी संक्रमणाचा धोका जास्त असतो हे लक्षात असू द्या.
स्विमिंग पुलात सुरक्षा करणे जोखमीचे काम
इतर ठिकाणचे नियम स्विमिंग पुलात लागू करणे सर्वात मोठे आव्हान आहे. आपण पिकनिकला गेल्यावर मास्क घालू शकतो. परंतु पूलमध्ये मास्क नाही घालू शकत. माणसे बुडावीत अशी आमची इच्छा नाही. म्हणून हे एक आव्हान आहे. पूलात दुसऱ्यांजवळ जाण्यापासून सावध राहा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.