आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा कहर:पाकमध्ये 100 लोकप्रतिनिधी बाधित, सत्ताधारी पक्षापासून विरोधी पक्षांतील दिग्गज नेत्यांना बाधा

इस्लामाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक तृतीयांशहून जास्त सदस्यांना संसर्ग

पाकिस्तानात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. देशात आतापर्यंत १.६० लाखाहून जास्त रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत संसर्गामुळे तीन हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला. परंतु कोरोनाने पाकिस्तानच्या संसदेवर हल्लाबोल केला आणि सत्ताधारी पक्षापासून विरोधी पक्षांतील दिग्गज नेते, मंत्र्यांना शिकार करण्यास सुरुवात केली. गेल्या काही आठवड्यांतच येथे १०० हून जास्त खासदार-आमदार बाधित झाले. एकूण संख्येच्या सुमारे १० टक्के एवढे बाधितांचे प्रमाण आहे.

कोरोनाने बाधितांमध्ये हायप्रोफाइल नेत्यांमध्ये दोन माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी, शाहिद खाकन अब्बासीदेखील आहेत.त्यांच्याशिवाय रेल्वेमंत्री शेख रशीद, सभापती असद कैसर, संसदेतील विरोधी नेते व नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ, गृहराज्यमंत्री शहरयार खान आफ्रिदी यांनाही संसर्ग झाला. पाकिस्तानच्या संसदीय सचिवालयानुसार ३४२ सदस्यांच्या संसदेतील एक तृतीयांशहून जास्त सदस्यांना कोरोनाने ग्रासले आहे. अनेक खासदार व नेत्यांनी अद्याप बाधित असल्याची माहिती दिलेली नाही.

अनेक नेते व मंत्री तर स्वत:हून क्वॉरंटाइन झाले आहेत. त्यांच्याशिवाय संसदेचे ४० कर्मचारीदेखील बाधित आहेत. पाकिस्तानात संसर्गाच्या दृष्टीने आवश्यक नियमांचे पालन करण्यात संसद सदस्यांमध्ये प्रचंड अनास्था दिसून येते. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढले आहे, असे सांगितले जाते. देशातील सामान्य नागरिकही संसर्गाने हादरला आहे.

इम्रान खान यांच्या पक्षाचे सर्वाधिक खासदार
पाकिस्तानातील हायप्राेफाइल नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातही इम्रान यांची सत्ताधारी पार्टी तेहरिक-ए-इन्साफच्या सर्वाधिक ३८ खासदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. प्रमुख विरोधी पक्ष पीएमएलएलनचे २७, तर बेनझीर भुत्तो यांच्या पार्टीचे २३ नेते बाधित झाले आहेत. आतापर्यंत ६ खासदार-आमदारांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...