आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारासाठी मदत हाेणार:अमेरिकेत विमानतळावर काेराेना चाचणी, प्रवासी स्वेच्छेने देताहेत नमुने, 3 नवे व्हेरिएंट आढळले हाेते

दिव्य मराठी विशेष24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात काेराेना महामारी जवळपास संपली आहे. परंतु अमेरिकेत नव्या व्हेरिएंटसंबंधीचे संशाेधन अद्यापही थांबलेले नाही. निगराणी सुरू ठेवल्यास काेराेनाचा चांगल्या प्रकारे मुकाबला करता येऊ शकताे, असे संशाेधकांना वाटते.त्यासाठी स्प्रेड पाॅइंट्सवर लक्ष देण्यात आले आहे. हे स्प्रेड पाॅइंटमध्ये विमानतळ येते. परदेश प्रवासावरून येणाऱ्या प्रवाशांची निगराणी, परीक्षण केले जात आहे. अशा प्रवाशांची काेराेना चाचणी घेतली जात आहे. ही चाचणी अनिवार्य नाही. परंतु प्रवासी स्वेच्छेने ही चाचणी करत आहेत. सप्टेंबर २०२१ पासून हा प्रकल्पास सुरुवात झाली हाेती. दर आठवड्याला १५ हजारांवर प्रवासी नमुने देत आहेत.

नमुन्यांचे आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. पाॅझिटिव्ह सॅम्पल्सचे जेनेटिक सिक्वेन्सिंगही करण्यात आले. प्रयाेगशाळेत पुन्हा विषाणूत बदल आढळून आला. तेव्हा त्याबद्दल सीडीसीच्या संशाेधकांना कळवण्यात आले. त्यानंतर या बदलावर जवळून नजर ठेवण्यात आली. त्यावरून विषाणूत काय बदल हाेऊ शकताे याची कल्पना येते. म्हणूनच सीडीसीचे संशाेधक बीए-३ व्हेरिएंटबद्दल आधीच सतर्क झाले हाेते. बीक्यू-१, एक्स बी बी, बीए २.७५.२ व्हेरिएंटचा विमानतळावरील निगराणीतून शाेध लागला हाेता. न्यूयाॅर्क, न्यूजर्सी, सॅन फ्रान्सिस्काे, अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी केली जाते.

अमेरिकेत सर्वाधिक मृत्यू झाल्याने सतर्क
४ नाेव्हेंबरला अमेरिकेत काेविडचे ४९ हजार ३२३ नवे रुग्ण आढळून आले. आठवड्याची सरासरी बाधितांची संख्या ४० हजार ८५७ एवढी आहे. अमेरिकेत १० लाख सात हजारांवर नागरिकांचा काेविडने मृत्यू झाला. ही संख्या जगात सर्वाधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...