आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरात कोरोना:तिसऱ्या लाटेच्या भीतीने फ्रान्समध्ये पॅरिससह १६ शहरांत लॉकडाऊन; बेपर्वाई पडली महागात, पॅरिसमध्ये आता आयसीयू खाटांचा तुटवडा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्राझीलच्या आयसीयूमध्ये खाटा शिल्लक नाहीत. याकडे मुलीने लक्ष वेधले आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाच्या परिसरात तिने निदर्शने केली

फ्रान्समध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने राजधानी पॅरिससह १६ शहरांत एक महिन्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊन शुक्रवारी रात्रीपासून लागू झाला. युरोपात गेल्या आठवड्यात १० टक्क्याने संसर्ग वाढल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. युरोपात कोरोनाची तिसरी लाट असल्याने फ्रान्सला त्याचा फटका बसला आहे. शुक्रवारी फ्रान्समध्ये गेल्या चोवीस तासांत ३४,९९८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. पॅरिसमध्ये आता आयसीयू खाटा उपलब्ध नाहीत. फ्रान्सचे आरोग्य मंत्री आेलिव्हर वेरन म्हणाले, पॅरिसमध्ये सुमारे १२०० लोक आयसीयूमध्ये दाखल आहेत. ही संख्या नोव्हेंबरमध्ये आलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेहून जास्त आहे. फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स म्हणाले, लॉकडाऊनच्या आधी लागू कडक निर्बंध नव्या लॉकडाऊनमध्ये लागू नसतील. या वेळी लोक फिरण्यासाठी घराबाहेर पडू शकतील. परंतु त्यांना घरापासून १० किमी भागात राहावे लागेल. इटलीत गेल्या सोमवारपासून देशभरात लाॅकडाऊन आहे. स्पेनमध्ये ईस्टरनिमित्ताने सवलत देण्यास सरकारने मनाई केली आहे. जर्मनीतदेखील बहुतांश क्षेत्रात अंशत: लॉकडाऊन आहे. युराेपात शुक्रवारी गेल्या २४ तासांत २ लाखांहून जास्त नवे बाधित आढळून आले आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक चिंताजनक बनू लागली आहे.

युरोपात लॉकडाऊनमध्ये लवकर सवलत देणे घातक
युरोपने कोरोनाची तिसरी लाट रोखण्याची संधी गमावली आहे. आता संसर्ग अनियंत्रित झाला आहे. युरोपातील बहुतांश भागात लॉकडाऊन लागू करावा लागत आहे. फ्रान्सच्या महामारी तज्ञ कॅथरिन हिल म्हणाल्या, नोव्हेंंबरमध्ये आलेली दुसरी लाट अजून संपलीही नव्हती तरीही आम्ही लॉकडाऊनमध्ये सवलत दिली. खरे तर ब्रिटनमधील नव्या रूपातील कोरोनाने आगीत तेल आेतण्याचे काम केले. युरोपातील आणीबाणी विभागातील वरिष्ठ अधिकारी कॅथरिन स्मॉलवूड म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी ब्रिटनचा नवा विषाणू युरोपात पसरला होता. तेव्हाच आम्ही इशारा दिला होता. हा विषाणू वाढला तर अनियंत्रित होऊ शकतो, असे स्पष्ट केले होते. आता लोकांच्या बेपर्वाईचा फटका समोर दिसत आहे. आता ही परिस्थिती अमेरिकेतही आहे. तेथे लॉकडाऊन रद्द केल्यास लाटेला निमंत्रण देण्यासारखे ठरेल.

२ लाखांहून जास्त कोरोना रुग्ण
-जर्मनी, स्पेन, इटलीसह अनेक देशांनी ईस्टरसाठी अनेक निर्बंध लावले आहेत.
-युरोपात गेल्या आठवड्यात १० टक्के संसर्ग वाढल्याचे आरोग्य संघटनेचे म्हणणे.
-युरोपात शुक्रवारी गेल्या चोवीस तासांत २ लाखांहून जास्त कोरोना रुग्ण आढळले.

बातम्या आणखी आहेत...