आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनापासून वाचण्यासाठी भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने मालदीव वारी करत आहेत. तेथे भारतीयांच्या संख्येत गतवर्षाच्या तुलनेत ५०% वाढ झाली आहे. यंदाच्या पहिल्या २ महिन्यांत तेथे ४४ हजार भारतीय पाेहोचले. ही संख्या २०२० च्या तुलनेत दुप्पट आहे. मालदीव पर्यटन विभागानुसार, भारतातूनच सर्वाधिक पर्यटक आले आहेत. चीन, जपान आणि दक्षिण कोरियाचे पर्यटक ९८% पर्यंत कमी झालेेत. पर्यटनांशी संबंधित तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या काही दिवसांपासून भारतात एक लाखावर कोरोना रुग्ण आढळत आहेत. दुसऱ्या लाटेमुळे व्यवसाय पुन्हा ठप्प झाले आहेत. अनेक शहरांत पुन्हा लॉकडाऊन लागला आहे. यामुळे लोक सुट्यांसाठी दूरवरच्या पर्यटनस्थळी जात आहेत. कोरोनाचा वाढता उद्रेक, लांबलेले लसीकरण यामुळे लोक लोग सुरक्षित ठिकाणी फिरायला जाण्याची योजना आखत आहेत. कोलकाताच्या अगवानी ट्रॅव्हल्सचे प्रमुख प्रदीप शर्मा म्हणाले, आधी मालदीव हे महागडे पर्यटनस्थळ होते.
मात्र आता तेथील हॉटेल्स आकर्षक डील देत आहेत. दक्षिण आशिया पूर्णपणे बंद अाहे. थायलंडनेही दरवाजे बंद केले आहेत. बॉलीवूूड कलाकार मोठ्या संख्येने मालदीवमध्ये सुट्या घालवत असल्यानेही लोकांचे आकर्षण वाढले आहे. मालदीव व भारताने एअर बबल सुरू केले होते. यामुळे कोरोना काळातही दोन्ही देशांत प्रवास करणे शक्य होत आहे. विमान कंपन्या स्वस्त प्रवासाची सुविधा देत आहेत. विस्ताराने मुंबई व मालेदरम्यान नॉनस्टाॅप विमान उड्डाण सुरू केले. मालदीवने पर्यटकांसाठी नियमही सोपे केले. प्रवासाच्या ९६ तासांआधी निगेटिव्ह रिपोर्ट दाखवल्यास क्वाॅरंटाइनची गरज नाही. ब्रिटन व इतर देशांत बाहेरून येणाऱ्यांसाठी सक्तीचे क्वाॅरंटाइन करण्यात येते.
उष्णता आणि कठोर कोरोना दिशानिर्देशांमुळे दुबईकडे पर्यटकांची पाठ
मालदीव हा हिंद महासागर क्षेत्रातील देश आहे. तो सुमारे १२०० बेटांचा समूह आहे. २०० बेटांवर नागरिक राहतात, तर १२ बेटे पर्यटकांसाठी आहेत. भारतीयांसाठी दुबई व मालदीव अावडीचे ठिकाण आहे. ईझी ट्रिप प्लानर्सचे निशांत पित्ती म्हणाले, दुबईला कोरोना चाचणी करावी लागते. मात्र मालदीवमध्ये असे नाही. यामुळे मालदीवमध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहेत. दुबईत सध्या खूप उष्णता आहे. यामुळे लोक तेथे जाण्यास उत्सुक नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.