आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Corona Update | 40 Out Of 80 Countries In The World Opened Lockdown, The Highest Being 26 Countries In Europe; 6 Countries Also Ready To Open Borders

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन 40 देशांनी उठवला!:195 देश व स्वायत्त क्षेत्र कोरोनामुळे बाधित, पैकी 41 टक्के देशांमध्ये लॉकडाऊन केला होता लागू

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
हे चित्र इटलीच्या मिलान शहराचे आहे. लॉकडाउन उघडल्यानंतर लोक फिरण्यासाठी बाहेर पडले - Divya Marathi
हे चित्र इटलीच्या मिलान शहराचे आहे. लॉकडाउन उघडल्यानंतर लोक फिरण्यासाठी बाहेर पडले
  • लाॅकडाऊन उठवणाऱ्यादेशांत सर्वाधिक 29 युराेपीय राष्ट्रे
  • युरोप : 10 प्रमुख देशांत शाळा, सलून, सिनेमा खुले
  • अमेरिका : 60 टक्क्यांहून जास्त सवलती, लोक कामावर

जगातील ८० देशांनी काेराेनामुळे लाॅकडाऊन लावला हाेता. त्यापैकी किमान ४० देशांनी लाॅकडाऊन उठवला आहे. ऑरा व्हिजनसह इतर अनेक संशाेधन संस्थांच्या एका अहवालातून हा दावा करण्यात आला आहे. लाॅकडाऊन उठवणाऱ्या देशांत पुन्हा उद्याेग, दुकाने, किनारपट्टी व इतर स्थळांचा समावेश आहे.

बहुतांश देशांनी सार्वजनिक ठिकाणांवर फिजिकल डिस्टन्सिंगची प्रमुख अट अनिवार्य करून लॉकडाऊनमध्ये सवलत दिली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देणारे सर्वाधिक २९ देश युरोपातील आहेत. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या टॉप-१० देशांपैकी ६ युरोपातील आहेत. लॉकडाऊन उठवणाऱ्या देशांतील सरकारच्या म्हणण्यानुसार अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी लॉकडाऊन उठवणे अत्यंत गरजेचे आहे. बहुतांश देश लॉकडाऊन उठवल्यापासून सीमा सुरू करण्यावर जास्त भर देत आहेत. काही देशांनी तर तारखांचीदेखील घोषणा केली आहे. काही त्यावर अद्यापही विचार करत आहेत. उदाहरणार्थ बेल्जियम, जर्मनी, स्वित्झर्लंड १५ जूनपासून पर्यटकांना प्रवेश देण्याची योजना तयार करत आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा या महिन्याच्या अखेरीस केली जाऊ शकते. ग्रीस १ जुलैपासून परदेशी पर्यटकांसाठी सीमा खुली करणार आहे. इटली ३ जूनपासून सीमा सुरू करणार आहे. नेदरलँड्सने काही देशांतील यात्रेकरूंना येण्याची परवानगी दिली आहे. पोलंड १३ जूनपासून सीमा खुली करणे शक्य आहे. जगातील २१३ देश व स्वायत्त क्षेत्रावर कोरोनाचा प्रादुर्भाव दिसतो. येथे आतापर्यंत ४,९१७,४१७ रुग्ण समोर आले आहेत.

युरोप : १० प्रमुख देशांत शाळा, सलून, सिनेमा खुले

> फ्रान्स : लाेकांना भटकण्यासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी दिली. प्राथमिक शाळा, सलून सुरू. रेस्तराँ व बार २ जूननंतर सुरू होणार आहे. पॅरिसहून लंडनला जाणारी काही उड्डाणे सुरू.

> स्पेन : राजधानी माद्रिद व बार्सिलोना वगळता इतर भागात लॉकडाऊन सुरू. बार, रेस्तराँ सुरू. मित्र-नातेवाइकांना प्रत्येकी १० लोकांचा गट एकत्र येण्याची परवानगी. पार्टीसाठी परवानगी दिली.

> ब्रिटन : सरकारने लोकांना कामावर परत येण्याचे आवाहन केले. खासगी किंवा कार्यालयीन वाहनाने प्रवासाचाही सल्ला दिला. रेल्वेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितले.

> बेल्जियम : दुकाने, संग्रहालय खुले. ८ जूनपासून कॅफे, रेस्तराँ, काही पर्यटन स्थळे सुरू राहतील.

> डेन्मार्क : दुकाने, उद्यान, रेस्तराँ व काही हॉटेल खुले. सार्वजनिक परिवहन सुविधा पुन्हा सुरू झाली. क्रीडा, थिएटर सिनेमा ८ जून नंतर खुले होतील.

> फिनलँड : ब्रिटनला जाण्यासाठी उड्डाणे सुरू. दुकाने सुरू झाली. रेस्तराँ, बार व सांस्कृतिक संस्था १ जूनपासून सुरू होतील. ऑगस्टपासून ५० जणांच्या समूहासह कार्यक्रमाची परवानगी दिली.

> जर्मनी : काही घरगुती उड्डाणे पुन्हा सुरू. दुकाने, रेस्तराँ खुले, हॉटेल २५ मेपासून सुरू होतील. मोठे कार्यक्रम ऑगस्टपासून आयोजित करण्यास परवानगी असेल. १६ राज्यांनी लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला.

> ग्रीस : काही अंतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू केली. १ जूनपासून ब्रिटनसाठी थेट उड्डाण सेवा सुरू होईल.

अमेरिका : ६० टक्क्यांहून जास्त सवलती, लोक कामावर

अमेरिकेच्या ५० राज्यांपैंकी ३० मध्ये लॉकडाऊन पुन्हा सुरू झाले. ११ राज्यांनी प्रांतीय स्तरावर लॉकडाऊन सुरू केले. म्हणजेच अमेरिकेच्या ६० टक्क्यांहून जास्त राज्यांतील लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. त्यात बीच, जिम, रिटेल दुकाने, रेस्तराँ, सलून, थिएरटर, उद्योग, कार्यालये, पूजा स्थळांचा समावेश आहे. जगातील बहुतांश देशांनी शाळा सुरू करण्यावर भर दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शाळा सुरू न झाल्यास देश सुरू झाल्यासारखे वाटणार नाही, असे आधीच म्हटले होते. लवकरच शाळा सुरू केल्या जातील, असे त्यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते. आेहियोसह अनेक राज्यांत ऑटो प्लांट सुरू झाले.

बातम्या आणखी आहेत...