आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना अपडेट:न्यूझीलंडमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले, बुधवारी 100 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 76 टक्के जनतेचे लसीकरण पूर्ण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी देशभरात तब्बल 100 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व रुग्णांमध्ये कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट आढळला आहे. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये आता कोरोना रुग्णांचा आकडा हा 3733 एवढी झाली आहे. यातील सर्वाधिक केसेस ऑकलॅंडमध्ये आढळल्या आहेत.

तर काही केसेस वाइकाटो या जिल्ह्यात आढळल्या आहेत. 58 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ज्यात 3 रुग्णांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत सुमारे 88 टक्के जनतेला कोरोना लसीचा सिंगल डोस देण्यात आला आहे. तर सुमारे 76% जनतेने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...