आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर लस:अमेरिकेत कोरोनावर पहिल्या लस mRNA-1273 ची मानवी चाचणी यशस्वी; औषध कंपनीचे शेअर्स वधारले

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • लस दिलेल्या 8 लोकांमध्ये आढळली प्रतिकारशक्ती

जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाची लस विकसित करण्यासाठी जिवापाड मेहनत करत आहेत. त्यातच सोमवारी अमेरिकेच्या मॉडर्ना या बायोटेक कंपनीने चांगली बातमी दिली. त्यांच्या लसची पहिली मानवी चाचणी यशस्वी ठरल्याचे कंपनीने म्हटले आहे.

अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीच्या मते, क्लिनिकल ट्रायलच्या पहिल्या टप्प्यात अॅलर्जी आणि संसर्गजन्य रोगांच्या राष्ट्रीय संस्थेने मार्चमध्ये निवडलेल्या ४५ पैकी आठ लोकांना या लसीचे दोन डोस दिले होते. या स्वयंसेवकांत कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्या रुग्णात आढळणाऱ्या अँटिबॉडीजइतक्याच अँटिबॉडी आढळल्या. आता या अँटिबॉडी किती प्रमाणात कोरोनापासून अखेरपर्यंत बचावासाठी गरजेच्या आहेत, याची उकल शास्त्रज्ञ करताहेत. जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांवर याच्या ट्रायल सुरू होतील, असे कंपनीने म्हटले आहे. चाचणी यशस्वी झाल्याचे वृत्त येताच अमेरिकी बाजारात मॉडर्नाचे शेअर्स २० टक्के वधारले. जगभरात लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लसीचा प्रभाव सुरक्षित आणि सहनीय

सोमवारी, मॉडर्नाने प्राथमिक टप्प्यातील चाचणीच्या अंतरिम निकालांविषयी सांगितले. त्यानुसार, एमआरएनए -1273 नावाची लस दिली गेलेल्या स्वयंसेवकाच्या शरीरात फक्त सामान्य साइड इफेक्ट्स दिसली. लसीचा प्रभाव सुरक्षित आणि सहनीय आढळला. 

मॉर्डनाने सांगितले की, , लसी घेणार्‍या स्वयंसेवकाची रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसशी लढताना कोविड -19 पासून बरे झालेल्या रूग्णांसारखी किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचे दिसून आले. मॉडर्नाचे सीईओ स्पीफन बॅन्सेल म्हणाले की, यापेक्षा चांगल्या डेटाची अपेक्षा करू शकत नव्हतो. 

42 दिवसांत मनुष्यावर चाचणी करणारी पहिली कंपनी

कोरोना लसींच्या शर्यतीत सर्वांना मागे टाकणारी मॉर्डना ही पहिली अमेरिकन कंपनी आहे. कंपनीने या लसीसाठी आवश्यक जेनेटिक कोड मिळवण्यापासून मानवांमध्ये चाचणी घेण्याचा प्रवास केवळ 42 दिवसांत पूर्ण केला. 

16 मार्च रोजी सिएटलमधील कैसर परमानेंट रिसर्च सुविधा येथे दोन मुलांची आई जेनिफर नावाच्या 43 वर्षीय महिलेस प्रथम लस दिली गेली. पहिल्या चाचणीत 18 ते 55 वर्षे वयोगटातील 45 निरोगी स्वयंसेवकांचा समावेश केला होता. यापैकी 8 जणांना सुरुवातीला लस देण्यात आली.

सुरुवातीच्या टप्प्यात किरकोळ साइड-इफेक्ट्स

मॉडर्नाचे मुख्य चिकिस्ता अधिकारी टाल जकन म्हटले की, लसीच्या अगदी थोडी मात्रा दिल्यानंतरही नैसर्गिक संक्रमणाचा सामना करण्यासाठी इम्यून सिस्टमने चांगली प्रतिक्रिया दिली आहे. या निकालांवर आणि उंदरांवर केलेल्या अभ्यासानंतर मिळालेल्या डेटाच्या आधारे कंपनी आता कमी डोस देऊन पुढील चाचण्या करण्याचा विचार करीत आहे.

टाल जकन ते म्हणाले की, चाचणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असे दुष्परिणाम होते जे बर्‍याच लसींमध्ये सामान्य असतात, उदाहरणार्थ, इंजेक्शनच्या ठिकाणी काही लोकांना लालसरपणा आणि थंडपणाचा अनुभव येतो. या डेटाने आमच्या विश्वासाची पुष्टी केली की एमआरएनए -1273 मध्ये कोविड -19 रोखण्याची क्षमता आहे.

मॉडर्नाचे शेअर तीन पटीने वधारले 

मॉडर्ना कंपनीच्या शेअर्सच्या किंमती फेब्रुवारीनंतर तीन पटीने वाढल्या आहेत. शुक्रवारी बाजार बंद झाल्याच्या वेळेपेक्षा 240 पटीने वाढ झाली आहे. प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये मॉडर्नाचे शेअर शुक्रवारच्या 66.69 डॉलरच्या बंद भावाच्या तुलनेत 86.14 डॉलरवर उघडला. 

बातम्या आणखी आहेत...