आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरात कोरोना:ओमायक्रॉननंतर आता प्लोरोनाचे संकट, इस्रायलमध्ये आढळला पहिला रुग्ण; येथे लोकांना दिला जातोय कोरोनाचा चौथा डोस

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण जग कोरोना आणि त्याचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे हैराण झाले आहे. दरम्यान, फ्लोरोनाचा पहिला रुग्ण इस्रायलमध्ये आढळून आला आहे. फ्लोरोना हा एक संसर्ग आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला कोरोना आणि इन्फ्लूएंझा या दोन्हीची लागण होते. हे पहिले प्रकरण असूनही इस्रायलने ते गांभीर्याने घेतले आहे. त्याचवेळी, कोरोनाची चौथी लस देशातील कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना बूस्टर डोस म्हणून दिली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, फ्लोरोना हा कोरोना आणि इन्फ्लूएंझाचा दुहेरी संसर्ग आहे. दुहेरी विषाणूमुळे ते आणखी घातक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, फ्लोरोनाची लागण झालेल्या रुग्णामध्ये न्यूमोनिया आणि मायोकार्डिटिससारख्या आजारांची लक्षणे दिसतात.

देशात गेल्या 24 तासांमध्ये 27,443 कोरोना रुग्ण आढळले
देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 27,443 पॉझिटिव्ह केस समोर आले आहेत. आज 282 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 9110 लोक बरे झाले आहेत. तर सक्रिय रुग्णांची संख्या शनिवारी रात्री उशीरापर्यंत 18051 होती. 94 नवीन ओमायक्रॉन संक्रमितांसह देशात शनिवारी नवीन व्हेरिएंटच्या पेशेंट्सची संख्या 1596 झाली. यामधून 576 ओमायक्रॉन पेशेंट्स बरे झाले आहेत. तर 1020 सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी 1,796 प्रकरणे आणि 1.73% पॉझिटिव्ह रेट नोंदवण्यात आला होता. तर गुरुवारी 2.44% पॉझिटिव्हिटी रेटसह 1,313 प्रकरणे नोंदवण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...