आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Corona Update | Marathi News | Corona's Havoc In China; Fear Of A Fourth Wave In Europe, Demand For A Fourth Dose Soon To Prevent Corona

कोरोनाची दहशत:चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; युरोपमध्ये चौथ्या लाटेची भिती, कोरोना रोखण्यासाठी लवकरच चौथ्या डोसची मागणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीन आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा नवा विषाणू अतिशय वेगाने पसरत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर ब्रिटनमध्ये देखील रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. यातील बहुतांश रूग्ण हे कोरोनाच्या ओमायक्रॉन BA.2 व्हेरियंटचे आहेत. युरोपमध्ये चौथ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. अशातच अमेरिकेतील प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊसी यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. रूग्णांचे प्रमाण असेच वाढत राहिले तर बुस्टर डोस किंवा चौथ्या डोसची गरज भासेल असेही अमेरिकेच्या तज्ञांनी सांगितले आहे.

ओमायक्रॉनच्या तुलनेत बीए.2 व्हेरियंटचा 50 ते 60 टक्के अधिक संक्रमक असल्याचा दावा फाऊसी यांनी केला आहे. त्यामुळेच येत्या काळात युरोपात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढेल. खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना बुस्टर किंवा चौथा डोस द्यावा लागेल असेही फाऊसी यांनी सांगितले आहे.

लसीसाठी मागितली मंजुरी
वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता, फायझर आणि मॉडर्ना या दोन कंपन्यांनी लसीचा चौथा डोस तयार केला असून, अमेरिकच्या आरोग्य विभागाकडे मंजुरी मागितली आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत युरोपात कोरोनाने मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे चौथ्या लाटेला कमी लेखण्याची चूक युरोपियन देश नक्कीच करणार नाहीत. त्यादृष्टीने अमेरिकन सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. आता संभाव्य धोका ओळखून भारतानेही बुस्टर डोसवर भर देण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...