आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Corona Update | Spraying Disinfectants In Open Doesn't Kill Coronavirus Even Poses A Health Risk Says WHO

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाबाबत इशारा:रस्त्यांवर किंवा इतर ठिकाणी जंतुनाशक फवारल्याने कोरोना विषाणू मरत नाही, असे करणे लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक - डब्ल्यूएचओ

जेनेवाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हे चित्र गुवाहाटीचे आहे, जेथे महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर जंतुनाशक औषध फवारत आहेत. - Divya Marathi
हे चित्र गुवाहाटीचे आहे, जेथे महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर जंतुनाशक औषध फवारत आहेत.
  • जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की धूळ व घाणीमुळे जंतुनाशक निष्क्रिय होते
  • जगभरात कोरोनाच्या 8 लसींची चाचणी सुरू, 110 डेव्हलपमेंटच्या स्टेजवर

सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारल्यामुळे कोरोनाव्हायरस मरत नाहीत, उलट असे केल्याने लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. रस्त्यावर आणि बाजारामध्ये जंतुनाशक फवारल्याने फायदा होत नाही कारण ते धूळ आणि घाणीमुळे निष्क्रिय होतात. असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. 

एखाद्या व्यक्तीवर थेट फवारणी केल्यास गंभीर आजार उद्भवू शकतात.

डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की, कोणत्याही परिस्थितीत एखाद्या व्यक्तीवर जंतुनाशक फवारणी करता कामा नये. यामुळे शारीरिक आणि मानसिक नुकसान होऊ शकते. असे केल्याने संक्रमित व्यक्तीद्वारे व्हायरस पसरविण्याचा धोका देखील कमी होत नाही. क्लोरीन आणि इतर विषारी रसायनांमुळे डोळे आणि त्वचेशी संबंधित त्रास उद्भवू शकतो. श्वास घेण्यात अडचण आणि पोट-आतड्यांसंबंधी रोग देखील होऊ शकतात.

जंतुनाशक ओल्या कपड्याने स्वच्छ केले पाहिजे

घरात किंवा ऑफिसमध्ये देखील थेट जंतुनाशक फवारणी करु नये, त्याऐवजी ते कपड्याने स्वच्छ केले पाहिजे. कोरोना व्हायरस विविध वस्तू आणि कामकाजाच्या ठिकाणांच्या पृष्ठभागावर असू शकतो. तो कोणत्या पृष्ठभागावर किती वेळ टिकतो याची कोणताही अचूक माहिती नाही. 

कोरोनाच्या 8 लसींची चाचणी सुरू 

कोरोना व्हायरसच्या लसीवर जगभरात काम सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच सांगितले की या वर्षाच्या अखेरीस आम्ही कोरोना लस तयार करू. चीनच्या आरोग्य अधिकारी झांग वेनहॉंग यांनी शनिवारी सांगितले की, ही लस पुढील वर्षी मार्चपर्यंत उपलब्ध होऊ शकेल. डब्ल्यूएचओच्या मते, जगभरात 8 कोरोना लसींची क्लिनिकल चाचण्या चालू आहेत, तर 110 लसी विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत.

बातम्या आणखी आहेत...