आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संक्रमणाचा धोका:कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही, जगाला यासोबत जगण्याची सवय लावावी लागेल- डब्लूएचओ

जेनेवाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. माईक रायन म्हटले की, कोरोना कधी संपेल सांगता येणार नाही (फाइल फोटो) - Divya Marathi
डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. माईक रायन म्हटले की, कोरोना कधी संपेल सांगता येणार नाही (फाइल फोटो)
  • लॉकडाउन हटविणार्‍या देशांना जागरुक राहण्याची गरज, संक्रमण कमी झाल्यानंतरच निर्बंध हटवा - डब्लूएचओ

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आणीबाणी कार्यक्रमाचे प्रमुख डॉ माईक रेयान म्हणाले की, कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणाह नाही. जगाने यासोबतच जगायला शिकले पाहिजे. ते म्हणाले की एचआयव्ही देखील अद्याप संपला नाही, परंतु आपण त्याच्याबरोबर जगत आहोत.  

रेयान म्हणाले की, "मी या दोन आजारांची तुलना करीत नाही, परंतु आपणास वास्तव समजले पाहिजे. कोरोना कधीपर्यंत संपुष्टात येईल याचा कोणताही अंदाज लावता येत नाहीय"

'संसर्ग दर कमी पातळीवर पोहोचल्यावर निर्बंध हटवा'

डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की, संसर्गाची नवीन प्रकरणे येत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाउन काढून टाकल्यास रोग पुन्हा पसरू शकेल. पुन्हा लॉकडाऊन करण्याची शक्यता येऊ शकते. जेव्हा नवीन प्रकरणांचा दर खालच्या स्तरावर येईल आणि बहुतांश संक्रमित बरे होतील तेव्हाच लॉकडाउन काढवा. अशा परिस्थितीत आपण प्रतिबंध काढून टाकल्यास संसर्ग होण्याचा धोका कमी होईल. संसर्ग जास्त असताना आपण निर्बंध दूर केल्यास, कोरोना झपाट्याने पसरू शकतो. 

'लस प्रभावी असणे आवश्यक'

डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन कार्यक्रम प्रमुखांचे म्हणणे आहे की, लस आल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग कमी होईल याबाबत सांगता येत नाही. गोवरसारख्या रोगांसाठी लस आहे, परंतु रोग संपलेला नाही. कोरोनाच्या 100 हून अधिक लसींवर काम सुरू आहेत, परंतु ही फार प्रभावी असणे गरजेचे आहे. ही सर्वांसाठी सहज उपलब्ध असावी.

बातम्या आणखी आहेत...