आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या बाधितांचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. देशात हे प्रमाण ५५ टक्क्यांनी घटल्याचे नोंद झाली आहे. ब्रिटनमध्ये ४ जानेवारी २०२२ रोजी कोरोनाकाळातील सर्वाधिक २.१८ लाख नवे रुग्ण आढळून आले होते. ब्रिटनच्या ३१५ पैकी ९५ कौन्सिलमध्ये रुग्णसंख्येत घट नोंदवली जात आहे. लंडनमध्ये ३१ डिसेंबर २०२१ पासून ११ जानेवारीपर्यंत सातत्याने नवीन रुग्णांचे प्रमाण कमी होत चालले आहे. ब्रिटनमधील हा ट्रेंड अगदी दक्षिण आफ्रिकेतील ट्रेंडसारखा असल्याचा दावा ब्रिटनच्या संशोधकांनी केला आहे. आफ्रिकेत १२ डिसेंबर रोजी ३७,८७५ नवे रुग्ण आढळून आले होते. दक्षिण आफ्रिकेत ११ जानेवारी राेजी ५,६६८ एवढ्या नव्या रुग्णांची नोंद झाली होती. ब्रिटन वगळता उर्वरित युरोपात मात्र नव्या रुग्णांत भर पडू लागली आहे. रुग्ण वृद्धीचा हा दर २९ टक्के असल्याचे स्पष्ट झाले. रशिया व ग्रीससारख्या पाच देशांत नव्या रुग्णसंख्येत घट होत आहे. असाच ट्रेंड दिसतो. अमेरिकेत शाळा सुरू ठेवण्यासाठी अध्यक्ष बायडेन यांनी शाळांना मोफत ५० लाख कोरोना किट देणार असल्याचे जाहीर केले.
स्वित्झर्लंड : क्वॉरंटाइनचाकालावधी १० वरून ५
स््वित्झर्लंडने क्वॉरंटाइनचा कालावधी १० वरून ५ दिवस केला आहे. त्यासाठी देशात आंदोलन होत होते. स्वित्झर्लंडमधील दररोजचे सरासरी संसर्गाचे प्रमाण ३९ टक्के आहे.
जर्मनीत एकाच दिवसात ८० हजार नवे रुग्ण
कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. लेवनार्ड यांनी एका संशोधनाच्या हवाल्याने एक दावा केला. डेल्टाच्या तुलनेत आेमायक्रॉनमुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण ५० टक्के कमी आहे. कॅलिफोर्नियात ३० नोव्हेंबर ते १ जानेवारीपर्यंत रुग्णालयात दाखल ५२ हजार रुग्णांपैकी एकालाही व्हेंटिलेटरची गरज भासलेली नाही. परंतु आेमायक्रॉन वेगाने फैलावतो, असे त्यांनी सांगितले.
कॅनडात लस न घेतल्यास कर भरावा लागणार
कॅनडातील क्युबॅक राज्यात यापुढे कोरोना लस न घेणाऱ्यांना कर द्यावा लागणार आहे. त्याला ‘आरोग्य योगदान कर’ असे नाव दिले. कॅनडात ३०,९५८ जणांचा मृत्यू झाला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.