आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या मिशिगन राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. बाधितांची संख्या वेगाने वाढू लागल्याने व्हेंटिलेटरचा तुटवडाही जाणवू लागला आहे. गेल्या चोवीस तासांत मिशिगनमध्ये कोरोनामुळे ११७८३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. सोबतच २३५ मृत्यू नोंदवले गेले आहेत. इंडियाना राज्यात गेल्या दोन आठवड्यांत बाधितांचे प्रमाण ४९ टक्के वाढले आहे. अशा स्थितीत रुग्णालयात सुरक्षा व संसर्ग टाळण्यासाठी नॅशनल गार्डला तैनात करावे लागले. या काळात आेमायक्रॉनचे आतापर्यंत ४३ रुग्ण आढळून आले. युरोपातही बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ झाली. संसर्ग वाढीमागे थंडीचे कारण आहे. त्याचबरोबर नाताळनिमित्त लोक खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करू लागले आहेत, हेदेखील संसर्ग वेगाने वाढीचे कारण आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. स्वित्झर्लंडमध्येही पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्येही नवीन रुग्ण आढळून आले . जर्मनीत डॉक्टरांनी पुढील महिन्यात चौथ्या डोसची शिफारस केली आहे.
विरोध : कोरोना निर्बंधांमुळे युरोपात निदर्शने सुरूच, सरकारचा निषेध
कोरोना संसर्गाचा वेग वाढत असल्यामुळे युरोपातील अनेक देशांतील सरकारे निर्बंध लागू करू लागली आहेत. फ्रान्स, जर्मनी, इटली, ऑस्ट्रिया, बेल्जियम, स्वित्झर्लंडमध्ये लस अनिवार्य करण्यात आली आहे. सोबत कोरोना लसीच्या बूस्टर डोससाठीदेखील मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु या निर्णयाला अनेक संघटनांनी विरोध केला आहे. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये शनिवारी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून नियमांचा निषेध करत होते. त्यांची बंदी स्वातंत्र्याच्या विरोधात आहे.
ब्रिटन : नियम न पाळल्यास पाच महिन्यांत ७५ हजार मृत्यू शक्य
ब्रिटनचे तज्ज्ञ प्रो. इलियानोर रिले म्हणाले, आेमायक्रॉनचा फैलाव वाढत असल्याने सरकारने कठोर नियम लागू करावेत. त्याची कठोर अंमलबजावणी झाली नाही तर पाच महिन्यांत ब्रिटनमध्ये ७५ हजारांवर मृत्यू होऊ शकतात. दररोज २५०० आेमायक्रॉन बाधित उपचारासाठी येऊ शकतात. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल सायन्सने एका विज्ञानविषयक मॉडेलच्या आधारे ही शक्यता वर्तवली आहे. ब्रिटनमध्ये या आठवड्यात नव्या रुग्णांचे प्रमाण १५ टक्के वाढल्याची नोंद आहे. ब्रिटनमध्ये कोरोना बूस्टर डोससाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. नाताळच्या काळात संसर्गाचा वेग मंदावला होता.
जग : इटलीत नव्या रुग्णांचे प्रमाण ३१ टक्के वाढले, सुपर ग्रीन पास अनिवार्य
- फ्रान्स देशातील पाच प्रांतात बाधितांची संख्या वाढल्याने रुग्णालयांत आणीबाणी जाहीर करण्यात आली.
- दक्षिण कोरियाने कोरोनाच्या बूस्टर डोसमधील अंतर कमी केले. आधी पाच महिने होता. नंतर तीन महिने.
- कॅनडा दररोज ३३०० नवे रुग्ण आढळून येत आहेत. १४६० लोक सरासरी रुग्णालयात दाखल होत आहेत.
- ऑस्ट्रेलिया न्यू साऊथ वेल्समध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले. चोवीस तासांत १३ रुग्णांचा मृत्यू.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.