आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाकिस्तानात एप्रिल २०२१ पासून काेराेनावरील लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी आराखडा तयार केला जात आहे, अशी माहिती आराेग्य विभागाचे संसदीय सचिव नाैशिन हामिद यांनी दिली.
ही लस पाकिस्तानातील नागरिकांनी माेफत उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी पाकिस्तानातील तेहरिक-ए-इन्साफच्या सरकारने लसीच्या खरेदीच्या निधीसाठी परवानगी दिली आहे. चीनच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी राहिली असून लवकरच नागरिकांना लस मिळू शकेल. दुसरीकडे पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने १५० दशलक्ष डाॅलर्सची रक्कम लस खरेदीसाठी मंजूर केली आहे.
दुसरीकडे पाकिस्तानात ४४ लाख ६ हजार ८१० रुग्ण असून गेल्या चाेवीस तासांत ३ हजार ४९९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या चाेवीस तासांत ३९ लाेकांनी प्राण गमावले आहेत. आता देशातील एकूण मृतांची संख्या ८ हजार २०५ वर गेली आहे. ३ लाख ४७ हजार लाेक संसर्गातून बरे हाेऊन घरी परतले आहेत. मात्र २ हजार ४६९ जणांची प्रकृती गंभीर आहे.
माेठी चाचणी झाल्याचे दावे
पाकिस्तानात आतापर्यंत ५६ लाख २७ हजार ५३९ तपासणी झाली आहे. चाेवीस तासांत ४२ हजार ९०४ तपासण्या झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यापैकी ८.१५ टक्के तपासण्या पाॅझिटिव्ह आढळून आल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.