आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Corona Vaccination News | Britain Vaccine Advisory Body Refuses To Approve Covid Jabs For Healthy 12 To 15 Year Olds; News And Live Updates

मुलांच्या लसीकरणावर मोठा निर्णय:ब्रिटनच्या लस सल्लागार संस्थेने म्हटले - 16 वर्षांखालील निरोगी मुलांना कोरोना लस देण्याची गरज नाही

लंडन21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाळा उघडण्यावर भर

जगभरात सध्या 18 वर्षांवरील लोकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. येत्या काही दिवसात जगात कोरोनाची तिसरी लाट येईल अशी शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे, अनेक देशात लहान मुलांवर कोरोनाची ट्रायल घेतली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत भारतातील मुले मोठ्या प्रमाणात प्रभावित होतील अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. परंतु, ब्रिटनच्या या निर्णयामुळे मुलांच्या लसीकरणावर नवीन चर्चा सुरु होऊ शकते.

डेली मेलनुसार, 12 ते 15 वर्षे वयोगटातील निरोगी मुलांना व्हायरसचा धोका कमी असल्याचे जेसीव्हीआयने शुक्रवारी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या 2 लाख युवकांना लस दिली गेली पाहिजे. कोरोनाची लागण झाली तर 10 हजार आजारी मुलांपैकी एकाची स्थिती गंभीर बनण्याचा धोका आहे. तर दुसरीकडे, 5 लाख निरोगी मुलांमध्ये हे एकाला होईल. त्यामुळे या मुलांना कोरोना लस दिली नाही तरी चालेल असे पॅनलने म्हटले आहे.

शाळा उघडण्यावर भर
शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण अधिक फायदेशीर ठरेल का? याबाबत पॅनलने सरकारला अन्यत्र सल्ला घेण्यास सांगितले आहे. यामध्ये शाळा खुल्या ठेवणे आणि भविष्यातील लॉकडाऊन टाळणे या गोष्टींचादेखील समावेश आहे. या योजनेला ग्रीन सिग्नल दाखवण्यासाठी शिक्षण सचिव गेविन विल्यमसन यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या पॅनेलवर प्रचंड दबाव असल्याचे मानले जाते.

ब्रिटनचे 4 मुख्य वैद्यकीय अधिकारी पुढील आठवड्यापर्यंत माध्यमिक शाळेतील मुलांना लसीकरण करून समाजाला कसा फायदा होईल याचे मूल्यांकन करतील. याव्यतिरिक्त, 16 वर्षांखालील पात्र मुलांना फायझर लस लागू करण्यास सांगितले जाईल. कारण हा चाचणी डेटा रोगी असलेल्या मुलांसाठी सुरक्षित असल्याचे दर्शविण्यासाठी पुरेसा असेल असेही पॅनलने सांगितले.

या देशात मुलांचे सुरु आहे लसीकरण

कॅनडा - जगात सर्वात आधी लहान मुलांचे लसीकरण कॅनडा देशाने केले. या देशात 12 ते 15 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणासाठी फायझर लसीला परवागनी देण्यात आली आहे. यापूर्वी कॅनडामध्ये 16 वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यात येत होते.

अमेरिका - अमेरिकेतही 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने फायझर-बायोएनटेक लसीला मान्यता दिली आहे. कॅनडा प्रमाणे अमेरिकेतही यापूर्वी 16 वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यात येत होते. अमेरिकेत आजघडीला 12 ते 15 वयोगटातील 6 लाखांपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

भारतात लसीकरणाला सुरुवात नाही
भारत सरकारने लहान मुलांच्या लसीकरणासाठी झायडस कॅडिलाची लस झायकोव्ह-डीला आपत्कालिन परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे ही जगातील पहिली डीएनए आधारित लस आहे. ही 12 वर्षांवरील मुलांसाठी वापरली जाऊ शकते. यापूर्वी, मॉडर्ना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल समोर आले होते. या चाचणीत 12 ते 17 वयोगटातील मुलांचा समावेश होता. कंपनीच्या मते, ही लस मुलांवर 100% प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे.

बातम्या आणखी आहेत...